K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 24 April 2021

लसीकरण हो लसीकरण करूनी घ्या हो लसीकरण


 लसीकरण हो लसीकरण करूनी घ्या हो लसीकरण सर्वांच्या सुरक्षिततेसाठी करुनी घ्या हो लसीकरण


लस आहे कोरोना विषाणूवर विश्वास ठेवा तुम्ही सरकारवर नका घेऊ हो कुठले टेंशन करुनी घ्या हो लसीकरण ||धृ|| ॥१॥


सरण ही थकले मरण पाहुणी ज्वाला ही रडल्या देह पाहुणी परिस्थिती आहे फारच विलक्षण


करुनी घ्या हो लसीकरण ॥ २ ॥


कोरोनाने सर्वच जगच ग्रासले


गल्ली ते दिल्ली याला त्रासले नका लावू पुन्हा ताळे बंधन करुनी घ्या हो लसीकरण ॥३॥


कोरोना विषाणूचा फारच धोका नका देऊ हो याला कसला मोका सरकारी बाबूंना करू द्या सर्वेक्षण


करुनी घ्या हो लसीकरण ॥ ४ ॥


अठरा ते पंचेचाळीस हवं वयवर्ष कोविशील्ड, कोवॅक्सिनने दिर्गायुष्य करूया सर्वजण आता रजिस्ट्रेशन करुनी घ्या हो लसीकरण ॥५॥


अहोरात्र झटताय सर्व कर्मचारी


काहींनी केली स्वर्गाची वारी नका ओढू अंगावर मरण


करुनी घ्या हो लसीकरण ॥ ६॥


माझे कुटुंब माझी जबाबदारी जगण्यासाठी आहे लस भारी एकच सर्वांचे विशाल मिशन


करुनी घ्या हो लसीकरण ॥ ७ ॥


रचनाकार :

श्री. विशाल दिलीप पाटील

प्राथमिक शिक्षक

No comments:

Post a Comment