K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 9 April 2021

 *खास  गृहिणीसाठी काहि महत्वाच्या टिप्स* ...


* काजू व इतर ड्रायफुट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लंवग टाका.

  

* कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.


* स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील.


* बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वचा व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका.


* पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या. बरे वाटेल.


* घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा.


* भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा.


* कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.


* दोसा बनविताना दोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा.


* हिवाळ्यात खोबर्‍याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑईलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या.


* पावसाळी दमट हवेत खोबर्‍याचे डोल तसेच ठेवू नये. एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहातात.


* तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल.


* लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा.


* पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते.


* पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळय़ा हलक्या होतात.


* शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. जास्त चवदार होतो.


* पुरण शिजताना हरभर्‍याच्या डाळीतच चमचाभर तूरडाळ टाकली की, पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो.


* मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करुन रव्याबरोबर लाडू करावेत.


* बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात. खमंग होतात.


* गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे.


* श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे.


* आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते.


* गुलामजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात.


* मेदूवडे करताना वडय़ाचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात.


* कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.


* ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही.


* छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात.


* ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते. तेव्हा १५-२० शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कडी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा.


* काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे.


* कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते.


* पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे, नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही.


* इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो. त्याप्रमाणे उपमा बनवावा. चांगला होतो.


* डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ ४:१ या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण ३:१ असे असावे.


* पुलाव, जिरा राइस, किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात. भात फडफडीत होतो.


* एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो. पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालते तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो.


* कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणीक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ्ड पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा.


* दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाला आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बरीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल.


* कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. याव्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये. ते लवकर खराब होतात.


* कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत.


* कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावं. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नाही. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत.


* टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो.


* साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.


* पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.


* गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.


* सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.


* बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.


* स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते.


* कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.


* आले - आले स्वच्छ क रून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते.


* आमरस - आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.


* आले, लसूण, मिरची पेस्ट - आले, लसून, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एक‍त्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते.


* बदाम - बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.


* बटाटा - बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.


* लोणची टिकवण्यासाठी काही उपाय - णच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचं वर्षभर टिकत नाही. लोणची टिकवण्यासाठी काही ‍उपाय:


* सर्वप्रथम लिंबू किंवा कैर्‍या स्वच्छ धुऊन स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.


* ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे, ती बरणीसुद्धा स्वच्छ धुऊन कडक उन्हात तीन-चार तास वाळवून घ्या.


* विळी किंवा चाकूही स्वच्छ धुऊन उन्हात वाळून घ्या.


* लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसह मिसळून घ्या. मिश्रण चांगलं हालवून घ्या. कैरीचं लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेलं तेल घाला.


* नेहमी लोनच्या वर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोनचे दोन ते तिन दिवसा आड़ हलवत राहिले पहिजे तर बुरसी लागत नहीं.


* पावभाजी - पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो, पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात.


* फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.


* अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.


* लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.


 *महत्वाच्या किचन टिप्स*


* मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा.


* तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो


* पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.


* सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल.


* रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा.


* कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.


* भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं.


* हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.


* पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्‍या खुसखुशीत बनतील.


* मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.


* डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.


* दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.


* हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.


* भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवर  ही शिजवू शकता.


* भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये यातील व्हिटॕमिन नष्ट होतात.


No comments:

Post a Comment