K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 20 April 2021

 🛕🚩 श्री राम नवमी बद्दल माहिती  🚩🛕


तिथी :  चैत्र शुद्ध नवमी

इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.


कृपया हे पण पहा : रामायण चे संपूर्ण एपिसोड्स पहा एकाच PDF मध्ये... 👈


महत्त्व : देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

उत्सव साजरा करण्याची पद्धत : `कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.

******************************************

🙏 कृपया हे पण वाचा : 👇

रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित ऑडियो मध्ये...

🚩⚜️🚩🔆🕉️🔆🚩⚜️🚩

    !! श्री प्रभु रामचंद्रांचा पाळणा !!

        प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. अयोध्या  नगरीचे.. रघुकुलाचेच.. दशरथाचेच भाग्य उजळले असे नाही तर समस्त भारतवर्षाचे भाग्य उजळले. 

        सत्यनिष्ठता.. आजन्म मर्यादेचे पालन.. पराकोटीची त्यागवृत्ती ही जीवनमुल्ये भारताला प्राप्त झाली. जगभर या रामजन्माचा सोहळा साजरा होवू लागला. जगातील सगळा अंधार दूर सारून उषःकाल झाला. आतातर संपुर्ण रामचरित्र हा आदर्श आहे.

        दरवर्षी जे भाग्यवान लोक रामजन्म सोहळा घरीच संपन्न करतात, ते हा रामजन्माचा पाळणा गात आनंदूत जातात..


  *_बाळा जो जो रे कुलभूषणा ।_* 

  *_दशरथनंदना ।_* 

  *_निद्रा करि बाळा मनमोहना ।_* 

  *_रामा लक्षुमणा ॥धृ॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_पाळणा लांबविला अयोध्येसी ।_* 

  *_दशरथाचे वंशी ।_*

  *_पुत्र जन्मला हृषीकेशी ।_*

  *_कौसल्येचे कुशी ॥१॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_रत्नजडित पालख ।_*

  *_झळके अमोलिक ।_*

  *_वरती पहुडले कुळदिपक ।_* 

  *_त्रिभुवननायक ॥२॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_हालवी कौसल्या सुंदरी ।_*

  *_धरुनी ज्ञानदोरी ।_* 

  *_पुष्पे वर्षिली सुरवरी ।_*

  *_गर्जती जयजयकारी ॥३॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_विश्वव्यापका रघुराया ।_*

  *_निद्रा करी बा सखया ।_*

  *_तुजवरी कुरवंडी करुनिया ।_* 

  *_सांडिन आपुली काया ॥४॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_येऊनि वसिष्ठ सत्वर ।_*

  *_सांगे जन्मांतर ।_* 

  *_राम परब्रह्म साचार ।_*

  *_सातवा अवतार ॥५॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_याग रक्षुनिया अवधारा ।_*

  *_मारुनि रजनीचरा ।_*

  *_जाईल सीतेच्या स्वयंवरा ।_* 

  *_उद्धरिल गौतमदारा ॥६॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_पर्णिल जानकी सुरूपा ।_*

  *_भंगुनिया शिवचापा ।_* 

  *_रावण लज्जित महाकोपा ।_* 

  *_नव्हे पण हा सोपा ॥७॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_सिंधूजलडोही अवलीळा ।_* 

  *_नामे तरतील शिळा ।_*

  *_त्यावरी उतरुनिया दयाळा ।_* 

  *_नेशी वानरमेळा ॥८॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_समूळ मर्दूनि रावण ।_*

  *_स्थापिल बिभीषण ।_* 

  *_देव सोडविल संपूर्ण ।_*

  *_आनंदेल त्रिभुवन ॥९॥_*

  *_बाळा जो जो रे....._*


  *_राम भावाचा भुकेला ।_*

  *_भक्ताधीन झाला ।_*

  *_दास विठ्ठले ऐकिला ।_*

  *_पाळणा गायीला ॥१०॥_* 

  *_बाळा जो जो रे....._*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧

      🌹🙏 जय श्रीराम 🙏🌹

🚩🏹🚩🔆🏹🔆🚩🏹🚩

रामनवमी का साजरी करतात?

चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.

       भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?

* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.

* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.

* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.

* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.

* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.

* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.

* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.

* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.

* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?

* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.

* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.

* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.

* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.

* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.

* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.

* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.


श्रीराम आरती मराठी अर्थासहित


श्रीराम आरती विडिओ सहित


उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।


जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।


प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।

मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।


निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।

आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।


अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।

अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।


सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार ।

सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।


– संत माधवदास


आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ


अ. ‘जय देव जय देव निजबोधा रामा’ या ध्रुपदातील ‘निजबोधा रामा’ म्हणजे ‘आत्मबोधरूप आत्मारामा’.


आ. ‘मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला’ यामधील ‘भुवनी त्राहाटिला’ म्हणजे हनुमानाने आकाशात भ्रमण करून स्वतःच केलेला शत्रूचा विध्वंस पाहिला.


इ. ‘अनाहतध्वनि गर्जती अपार ।’ याचा भावार्थ आहे, श्रीरामाच्या विजयाप्रीत्यर्थ मेघनाद, तसेच घंटा, शंख, भेरी इत्यादी वाद्यांचा अपार नाद होऊ लागला. मेघनादासारखा नाद स्वर्गस्थ देवतांकडून होत असल्याने त्याला ‘अनाहतध्वनी’ असे म्हटले आहे.


ई. ‘अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।’ यातील ‘अठरा पद्मे’ म्हणजे १८० लक्ष कोटी.


उ. ‘सहजांची आरती वाद्यांचा गजर ।’ याचा अर्थ सहजावस्थेत असणार्‍या वसिष्ठादी मुनींनी प्रभु श्रीरामचंद्रांची आरती केली आणि मंगलवाद्यांचा गजर केला, असा आहे.


ऊ. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

रामनवमी व्रताचे फळ

* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.

* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.

* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

हे पण वाचा : श्री राम रक्षा स्तोत्र मराठीत... 

रामनवमी नवमी विशेष

        रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस.

             श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.

श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या - कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.

श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.

श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.

मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.

ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.


स्टेटस व्हिडिओ -




No comments:

Post a Comment