K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 20 April 2021

 तीर्थक्षेत्र कार्ले एकविरा आई ची महती

तीर्थक्षेत्र कार्ले एकविरा आई

        कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देउन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद “जोगेश्वरी देवीची“ शेन्दुंर चर्चीत मुर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभु, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रीय, वैश्य इ. समाजाची आई एकविरा कुलस्वामीनी आहे. त्यामुळे ठाणे, मुबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेषकरून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातुन भाविक आईच्या दर्शनाला येतात. दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिरा शेजारी “ प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिध्द आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुगं हे नयनरम्य गड किल्ले कार्ला गडावर चढताना दृष्टीस पडतात. श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थानच्या वतीने प्राथमिक सेवासुविधा पुरवित गडावर अनेक सुधारणा केल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत तरे यांच्या अथक प्रयत्नांनी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, राहण्याची, रस्त्यांची, प्रसादाची व दर्शनाची योग्य काळजी घेतली जाते. गडावर लवकरच रोप-वेची सुविधा ही सुरू होणार आहे. आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेले श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. संस्थेच्या वतीने गडावर यात्रा, पालखी, होमहवन, जागरण, गोंधळ, भजन, किर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. आईच्या जगभरातील भाविकांसाठी विश्वदर्शन आईची वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे आईचे दर्शन अर्थात विश्वदर्शन झाले आहे. जगातून कुठूनही आईचं दर्शन घेणं आता सोप्प झालं आहे. आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरेचरणी प्रार्थना! सदानंदाचा उदो उदो! आदिमाउलीचा उदो उदो!! आई एकविरेचा उदो उदो!! जय एकविरा!

विधी आणि दिनचर्या


        एकविरा आईचे मंदीर दररोज पहाटे ५ ला उघडले जाते मंदीरात गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केले जाते. तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेच्या मुळ मुर्तीची पहाटे ५.३०ला काकड आरती केली जाते, ६ वाजून ३० मिनीटांनी अभिषेकाला सुरुवात होते. सुरुवातीला आईच्या डाव्या बाजूस असलेल्या जोगेश्वरी देवी (आईची नणंद) हिचा यथोचित अभिषेक केला जातो, मंदीरात सर्वत्र उदबत्ती-धूपाचा सुगंध पसरतो घंटीचा नाजुक स्वर आणि सडोपचार एकविरा आईच्या मंत्राचा जप अशा मंगळमय प्रसन्नमय वातावरणात आई एकविरेच्या अभिषेकाला सुरवात होते आईला पंचामृताने सडोपचाराने अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर आईला नविन वस्त्रे परिधान केली जातात, मग आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो त्यानंतर आईला सुवर्ण अलंकाराने मढवलं जातं. फुलानीं आईला सजवल जात सुगंधी चाफ्याच्या फूलांचा हार  देवीला घातला जातो. मोगरा-आबोलीच्या फूलाचीं आईला वेणी घातली जाते. आईचं साजशृंगार झाल्यावर आईची आरती केली जाते, आईचे सर्वविधी हे ब्राम्हणांच्या हस्ते होतात, आईचं ते प्रसन्न रुप पाहुन मन अगदी उल्हासित होतं. मनात नविन चैतन्यं निर्माण होतं आलेल्या भाविकाचं नाव व गोत्र यांचा संकल्प सोडला जातो. कुणा भक्ताला स्वहस्ते अभिषेक करावयाचा असल्यास देवस्थानच्या माध्यमातूनं रु. १००० (एक हजार रूपये)ची पावती फाडून भाविक स्वहस्ते अभिषेक करू शकतात. सकाळी ६ वाजल्या पासूनच आईच्या दर्शनाला सुरुवात होते. आईला १ वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवलं जातं. सायंकाळी ७ वाजता देवीची यथोचीत आरती केली जाते. नंतर आईचा मुखवटा उतरवला जातो आणि मंदीर बंद केले जाते.

       सकाळचे सर्वविधी प्रथे-परंपरेप्रमाणे ब्राम्हणांच्या हस्ते होतात, देवीच्या गाभाऱ्याची देखभाल, देवीची ओटी भरणे, भाविकांनी आणलेली हार-फुलं भेटवस्तु देवीपर्यंत पोहचविण्याचं काम तेथील स्थानिक गुरव मंडळी करतात ही परंपरा फार पूर्वीपासून सूरु आहे.

पालखी सोहळा

कार्ला गड

        मंबई-पुणे महामार्गावर (११० कि.मी.) लोणावळ्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस पाच कि.मी. अंतरावर वाकसईजवळ कार्ला फाट्यावरून ३ कि.मी. अंतरावर कार्ला गड आहे. कार्ला फाट्यावर विश्वस्त मंडळाने बांधलेला भव्य व रेखीव प्रवेशव्दार आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हे स्थान समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर आहे. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच थंड असते. नयनरम्य निसर्ग चोहीकडे झाडे, देखण्या पर्वतरांगांचा हा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होवून जातं. डोंगराच्या पायथ्याशी कार्ला गाव वसले आहे. जवळच नजरेस एक पुरातन तलाव दिसतं. त्या तलावाच्या शेजारी ‘ विहार’ (वेहेर) गाव वसले आहे. कार्ला गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीवर उजव्या हाताला देवीचे मंदिर आहे. मंदिरात ३ फुट उंचीची देवीची मुर्ती आहे. बाजूला शंकराची पिंडी आहे. कार्ला गडावर पायऱ्यांची व्यवस्था पेशव्यांनी केली आहे. या पायऱ्यांपासून पुढे थोड्या अंतरावर डोंगर उतारावर २० फुट व्यासाची प्राचीन विहीर आहे. बाजूला एक हौद आहे. या हौदात वर्षभर पाणी असते. हे पाणी चवीला गोड आहे. हौदातलं पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. विश्वस्त मंडळाच्यावतीने डोंगराच्या परिसरात ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम येथे राबवले जातात. ट्रस्ट व वनखाते यांच्यावतीने डोंगर परिसरात अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. जेणेकरून भाविकांना सावली, गारवारा मिळेल व डोंगराची झीजही थांबेल. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून नविन रस्ता बांधला आहे. हा रस्ता डोंगराच्या मध्यापर्यंत जाऊन पोचतो. कुठलीही गाडी सहज जाऊ शकते. ट्रस्टच्या माध्यमातून तेथे भव्य पार्कींगची व्यवस्था केली आहे. त्याला लागुनच सुलभ शौचालय बांधले आहे. भक्तांना पिण्याकरीता पाणपोई बांधली आहे. डोंगरावर अपंग, अशक्त, वृध्द नागरिकांना वर जाण्यासाठी ‘ डोलीची’ (पालखी) सोय आहे. डोंगर चढताना रस्त्यात एक मंदिर लागते, या मंदिरात देवीच्या पावलांचे ठसे खडकात उमटले आहेत. या मंदिराला पाचपायरी देवस्थान ‘एकविरा देवी पादुका मंदिर’ असं म्हणतात. तेथून थोड वर गेल्यावर डाव्या हाताला लांब एक पडिक धर्मशाळा आहे ती आता वापरात नाही. पायऱ्यांना लागूनच पाच मिनीटांच्या अंतरावर एकविरा देवस्थानाच्या माध्यमातून प्रशस्थ, अद्यावत सर्व सुखसोईनी परिपूर्ण २० खोल्यांचे माँसाहेब मीनाताई ठाकरे भक्तधाम भाविकांना राहण्यासाठी बांधले आहे.  डोंगर चढून वर आल्यावर एक प्रवेशव्दार लागते. ते पुराणवस्तू खात्याचे केंद्र आहे. त्याच्यासमोर वरच्या बाजूस त्यांचेच गेस्ट हाऊस असून सध्या ते बंद आहे. पुढे आत गेल्यावर एक भल मोठ पिंपळाच झाड दिसतं. तिथून पुढे डोंगरात कोरलेल्या भव्य लेणी आकर्षित करतात. कार्ला गडाच्या कुशीत प्रकटलेल्या आई एकविरेचे मंदिर आहे. आईच्या दर्शनाने मन प्रसन्न होवून जाते. पुढे गेल्यावर नगारखान्याची इमारत लागते. इथे दररोज पहाटे काकड आरतीस दुपारच्या आरतीस व संध्याकालच्या आरतीस नगारा वाजवला झातो. सध्या विजेवर चालणारा नगारा आहे. नगारखान्याची दुमजली इमारत पुण्यातील पेशवे सरकारने बांधली आहे. या इमारतीची बांधणी दगड कोरून ही वास्तू बनवली आहे. सुंदर महिरप, चौकोन प्रवेशव्दार, दोन्ही बाजूस व्दारावर दिवे ठेवण्यासाठी ३ फुटी स्तंभ, प्रवेशव्दारावर दोन नक्षीचे वर्तुळ, मधोमध गणपतीचे वर्तुळ आहे. वर जाण्यासाठी  दगडी जीना आहे. मध्यभागी रेखीव गणपतीची मुर्ती आहे. पेशवे काळात १८१८ पर्यंत पेशव्यांच्या वतीने देवीसाठी हा नगार झडत होता. पेशव्यांनी एकविरा देवीच्या दिवाबत्तीची पुजेची सोय केली होती. जनार्दन स्वामी प्रित्यर्थ असा शीलालेख या नगार खान्यात आहे. नगारखान्यावर श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्ट मंडळाचे कार्यालय आहे. भक्तांना सुलभतेने रांगेत दर्शन घेण्याकरीता ऊन-पावसापासून बचाव होण्यासाठी आई एकविरा ट्रस्टच्या माध्यमातून पत्र्याची शेड बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे गर्दी वाढली तरी सर्व भक्तांना शिस्तबध्द पध्दतीने आई एकविरेचे दर्शन घेता येते. रांगेतील भक्तांना आईचे दर्शन व नामस्मरण करण्यासाठी ठिकठिकाणी डिजीटल स्क्रीन देवस्थानच्या वतीने लावल्या आहेत. नगारखान्याच्या आत गेल्यावर कार्ला लेण्यांच्या उजव्या अंगाला एक भव्य स्तंभ लागतो. या स्तंभाच्या पायथ्याशी देवीचे वाहन असलेला सिंह आहे. सिंह स्तंभासमोरच म्हणजे लेण्याच्या व्दाराच्या डाव्या अंगाला एका दगडी चबुतऱ्यावर श्री एकविरादेवीचे सुप्रसिध्द मंदिर आहे. एकविरेच्या मंदिरा समोरच्या बाजूस ‘बाबाजी पादुका समाधी’  आहे.  ही समाधी दगड रचून बनवली आहे. चारपदरी दगडी छप्पर असलेली प्राचीन समाधी आहे. त्यात बाबाजींच्या पादुका आहेत. भाविक त्यांचे दर्शन घेतात. बाबाजींच्या समाधी समोर कोरीव दगडांच्या ५ थरात ७.८ फुट इंचाचा एक स्तंभ आहे. स्तंभाचा खालचा चौरस चौथरा ४ बाय ४  फूट आहे . या स्तंभाबद्दलचा कुठलाच पुराव सध्या उपलब्ध नाही. त्याच्या समोर डोंगराच्या कडेला एका चवथऱ्यावर मानी देण्याचे स्थान आहे, आईला प्रसाद येथे ठेवला जातो.

        आई एकविरेचे मंदिर डोंगरात असल्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत तांदळा दगडात आईची स्वयंभू मूर्ती आहे तिकडे मंदिर बांधण्यात आले. मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने जिर्णोध्दार केला असल्याचा पुरावा मिळतो. तसेच मंदिर प्रवेशव्दाराच्या लोखंडी कमानीवर एका घंटेवर इ.स. १८५७ साल असल्याचे दिसते. ही अक्षरे इंग्रजीत कोरलेली आहेत.

        मंदिरात प्रवेश करताना नाण्यांनी भरलेला उंबरठा व दरवाजा दिसतो . दर्शनास आलेल्या भाविकांनी श्रध्दे पोटी हि नाणी लावली आहेत. यातील काही चांदिची नाणी काढून देवस्थांनाने गाभाऱ्यातील दगडावर सुंदर नक्षी काम करून चांदीचा पत्रा बसवला आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम नजरेस पडणारा आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा ते नयन रम्य नक्षी काम पाहून व आईचे रूप पाहून भाविक आपली सारी दु:ख विसरून जातात. २००२ साली एका भाविकाने ५ किलो सोन्याचा हार व मुकुट आईला अर्पण केला. तसेच अनेक भाविकांनी आईला चांदीसोन्यापासून बनवलेले अनेक अलंकार अर्पण केले आहेत. त्यात हार, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, नथ, अगंठी, पैंजण व निरजंन, ताट-वाटी, पेला, घंटी, ताम्हण, दिवा, फुल अश्या अनेक प्रकारच्या वस्तू भक्त आई एकविरेला अर्पण करतात. आईची प्रचिती भक्तांना नेहमीच येते. एकंदरीत आजच्या धकाधकीच्या काळात, थकवा, दु:ख, विसरून जाण्यासाठी, पुन्हा नवीन उमेद जागवण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्गतील सौंदर्याने आलेल्या भक्तगणांचे मन प्रफूलीत होवून जाते.

अश्विन नवरात्रौत्सव

        श्री एकविरा आई मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री उत्सव चालतो. पृथ्वीची प्रतीकात्मक पूजा म्हणून घटस्थापना केली जाते. नऊ प्रकारची धान्य पेरून उगवली जातात. सृष्टीच्या सृजन शक्तीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवसाचे एक महत्व आहे. ट्रस्टच्या माध्यमातून नऊ दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दुर्गा स्तोत्र पठण, भजन, जागरण, किर्तन, प्रवचन, शिबीर, आईचा अभिषेक व इतर या दरम्यान यात्रेच्या निमित्ताने अनेक राजकिय नेते, सामाजिक नेते, कलाकार आईच्या दर्शनासाठी न चुकता कार्ला गडावर येतात. मंदिरात नऊ दिवस चौघडा झडतो, नगारा वाजविला जातो. घंटा नादाच्या तालावर पंचारती होते. नवमीच्या मध्यरात्री होम हवन होते. या होमाला ‘नवचंडी होम’ म्हणतात. या होमाला विशेष महत्व आहे. होमाचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक गडावर येतात. आईचं दर्शन घेऊन नंतर रांगेत उभ राहुन होमाचे दर्शन घेऊनं होमातील राख कपाळी लावून होमात नारळ, कोल्हा (भोपळा), लाकुड, कारवी, फळं, अगरबत्ती, कापूर, लिंबू अर्पण करतात. होम सुरू असतानाच पहाटे शेवटी बोकडं बळी दिला जातो. त्याच्या (काळजीची) तिरापणि करून सर्व भक्तांना त्याचा प्रसाद वाटला जातो.

आई एकविरा,धुळे

       दशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा सण भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. मंदिरात झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं बनवून पुर्ण मंदिराभोवती लावतात. देवीच्या चरणी आपट्याची पाने, झेंडूची फुलं वाहुन सर्व भक्तगण सोनं लुटतात. दसऱ्याच्या निमित्ताने भक्त दानधर्म करतात.

एकविरा आई दर्शन

स्रोत : संतसाहित्य

No comments:

Post a Comment