मोड आलेली कडधान्ये... आपल्या आहारात नेहमी असू द्या...👇
... सकाळी न्याहारी करतांना अंकुरित कडधान्ये खाणे नेहमीच चांगले असते. कारण त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश व उत्साहित राहता. अंकुरित कडधान्ये खाल्ल्यास ह्रुदयरोगाचि समस्या दूर होते, रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते. अंकुरित धान्यामधिल अॅंटि आॅक्सिडंट शरिरातील फ्रि रेडिकल्स नष्ट करतात. ज्यामूळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
अंकुरित धान्यातिल व्हिटॅमिन व मिनरर्लस केसांसाठी व त्वचेसाठी फायदेशीर असतात. कारण यात विटामिन सी.जास्त प्रमाणात असते. व त्यामुळे त्वचा नितळ व चमकदार होते.
मधुमेहि रूग्णांनी यांचे सेवन केल्याने साखर नियंत्रणात राहते. तज्ञांच्या मते मोड आलेल्या मेथि दाण्यांचा आहारात वापर केल्याने त्यांना चांगला फायदा होउ शकतो..
.. डोळे निरोगी ठेवण्यासाठी अंकुरित धान्याचे सेवन करणे लाभदायक आहे. , पचनक्रिया सुधारण्यासाठी, एसिडिटि कमी करण्यासाठी अंकुरित कडधान्ये खावित कारण धान्याला मोड आल्यामुळे त्यामधील कार्बोहाइड्रेट व प्रोटिन्स आणखी वाढतात. पाचक पदार्थाचि वाढ झाल्याने मोड आलेली कडधान्ये शरिरासाठि उत्तम ठरतात.
शरिरातील स्टॅमिना वाढणे म्हणजे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणं, अंकुरित धान्यामुळे शरिराला पुरेशी ऊर्जा मिळते. आणि मग दिवसभर थकवा वाटत नाही.
..जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात अंकुरित कडधान्यांचा समावेश करावा. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पोट लगेच भरतं, वारंवार भूक लागत नाही.
पण पोषक तत्वे भरपूर असल्याने कुपोषण होत नाही...अंकुर येण्यासाठी धान्य अथवा कडधान्ये काही तास पाण्यात भिजवून ठेवा. सहा ते सात तासांनी ही धान्ये भिजून फुगतात. मग हे भिजवलेले कडधान्ये एका स्वच्छ कापडात रात्रभर बांधून ठेवा. सकाळी मोड येतात.
मोड आलेल्या धान्यांमधील स्टार्च साधारणपणे ग्लुकोज, फ्रॅक्टोज, व माल्टोज शर्करेत रूपांतरित होते. ज्या मूळे अंकुरित कडधान्ये चवीला स्वादिष्ट, व पचायला हलकि होतात..
अंकुरित धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए. बी, मी डी, व के, भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फाॅस्फरस, पोटॅशियम, व लोह असतं. यासोबतच मोड आलेल्या धान्यांमध्ये भरपूर फायबर, फाॅलेट, ओमेगा ३ अॅसिड देखील आहे.
अंकुरित कडधान्ये व धान्ये नियमित खाण्याने तुमच्या शरिराचा पुरेसे पोषक घटक मिळतात..
No comments:
Post a Comment