K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 आंबा....🥭.... Mango...


     कसं असत नं.. ॠतुचक्र हे एकामागोमाग फिरत राहतं. ज्या स्वादिष्ट फळाचि वाट बघत असतो. तो ॠतु अगदी उभा राहिला आहे. आला उन्हाळा ..आंबा अवतरला. आता काहिच दिवसांतच बाजारात आंब्याच्या पेट्या दिसायला लागतिल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय प्रिय आहे आंबा.. हे फळ केवळ रूचिकरताच उपयोगी नाही तर हे औषधं म्हणून फार महत्त्वाचे आहे.

....तर बघू या आंब्याचे फायदे..👉आंब्यात जीवन सत्व ,अ, जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने रातांधळेपणावर गुणकारी आहे. बुबुळांचि शुष्कता, डोळ्यांचि आग होणे, खाज येणे, हे नेत्ररोग

  उन्हाळ्यात नियमित आंबा सेवन केल्याने टाळता येतात.


              आंबा आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहे. आमाशयाच्या रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. आंबा खाल्ल्यास मलावरोध होत नाही. पिकलेला आंबा  पोट साफ करणारा आहे.एखाद्या व्यक्तिचे वजन वाढत नसेल तर पिकलेला आंबा व दूध घ्यावे.. जुलाब होत असल्यास आंब्याच्या कोयिचे चूर्ण मधात मिसळून घ्यावे. तसेच श्वेतप्रदरावर देखिल या कोयिचे चूर्ण मधात मिसळून घ्यावे.कोयीचे वाळलेले तुकडे घालून खाल्ल्यास आवेचे जंत नष्ट होतात.

   ताज्या आंब्यातुन पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते.१०० ग्राम आंब्यातुन १५६ ग्राम पोटॅशियम मिळत यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, ह्रदयरोग होतं नाही. तसेच मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी ३-४ आंब्याचि पाने पाण्यात उकळून व रात्रभर भिजत ठेवून, सकाळी हे वाटून व गाळून घ्यावे. याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो..

   केसांच्या सौंदर्यासाठी आंब्याचा उपयोग.. आंब्याच्या कोयिच्या बाहेरिल भाग काढून गर काढून तिळाच्या तेलात घालून काहिच दिवस उन्हात ठेवून मग हे तेल केसांना चोळून लावावे.याने केस पांढरे होत नाही, गळत नाही, लांबसडक काळेभोर होतात.नाकातुन रक्त येणे, कानातून रक्त येणे अशा रक्तपित्त विकारांवर आंब्याच्या आंतरसालिच चूर्ण किंवा काढा घ्यावा.

       आंब्याचि पाने पाण्यात उकळून हे पाणी गाळून बाटलीत ठेवा. आणि डोळ्यात ड्राॅप्स म्हणून वापरावे. म्हणजे डोळ्यातून वारंवार पाणी येणं, सूज येणे, धूसर दिसणं, डोळे जाणे, रांजणवाडी आदि

 विकारांवर हे थेंब डोळ्यात घातल्याने आराम पडेल.कोवळ्या पानांचा लेप करून त्वचा विकारांवर लावल्याने बरे होतात.आंब्याचि साल व्रण रोधक, स्तंभक, व गर्भाशयाचि सूज घालवणारी आहे,

                आंब्याचि पाने चावून नंतर टाकून द्यावी. त्या रसाने आवाज सुटतो., खोकला थांबतो, व हिरड्यांचा पायोरिया बरा होतो. आंब्याच्या पानांचा चिक टाचांच्या भेगा बर्या करतो.आंब्याच्या गोंदाचा सांधेदुखी त खुप उपयोग होतो... एरंडेल तेल, लिंबाचा रस, हळद, व आंब्याचा गोंद समप्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून यांचा लेप सांधा निखळणे,पाय मुरगाळणे, लचकणे अशा ठिकाणी लावावा.

  पिकलेला आंबा शक्तिवर्धक व रूचकर आहे. आंब्याने कांति सुधारते, कच्च्या कैरीचे पन्हे करून पिल्यास उन्हाळा बाधत नाही.कैरीचा किस फडक्यात बांधून हे डोळ्यांवर ठेवल्यास थकवा, ताण दूर होतो.

    थोडक्यात  आंबा हा आपल्या जवळचे सर्व काही देउन  मानवजातीला उपक्रूतच करतो.....

No comments:

Post a Comment