K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 31 January 2021

आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय

1) आहार

2) स्वच्छता

3) करमणूक

4) व्यायाम व विश्रांती

5) नोकरी

6) पर्यावरण

आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे

आहार

     दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

स्वच्छता

     व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी सारखे रोग उदभवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

करमणूक

     मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. व्यक्ती जेव्हा उदासिन बनतो, तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सुयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ लाभते.

व्यायाम व विश्रांती

     व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येतो. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ आरोग्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.                        व्यायामाबारोबच विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रिया अंतरिक सहसंबंध आहे. व्यक्तीचे शरीर म्हणजे यंत्र नव्हे. विशिष्ट काळापर्यंत व्यक्ती एखादेच काम करू शकते. पुन्हा तिला थकवा येतो. तेव्हा विश्रांती गरजेची असते. योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारची विश्रांती घेतल्यास विश्रांती नंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

नोकरी

     साधारणपणे व्यक्ती दोन प्रकारचे कार्य करते. बैठया स्वरुपाची आणि बौद्धीक स्वरुपाची काही कामे फारशी शारीरिक ताण न पडता व्यक्तीला करावी लागतात. काही कामे व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करून आपली शक्ती उर्जा खर्च करून करावी लागतात. उदा. शेतमजूर, हमाल, कारखान्यातील कामगार इत्यादी व्यक्ती शारीरिक कष्टाची कामे करतात. कामाच्या स्वरूपावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

     नोकरी करत असतांना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक स्थिती व कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते.

पर्यावरण

     सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होतो. व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती समतोलाची राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो

     अशाप्रकारे व्यक्तीचे आरोग्य जपण्यासाठी किंवा व्यक्तीच्या आरोग्यासाठी वरील घटक महत्त्वपूर्ण असतात. जर व्यक्तीस आरोग्याने साथ दिली तर त्या व्यक्तीस ते काम करण्यास सांगेल ते काम करता येणार नाही. शरीर व मन निरोगी असणे ही व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते.                     

      कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपले जीवन जगात. तिच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे व त्यास रोगाने जर जर केले तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जातेएखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर संपूर्ण समाज सुद्धा निरोगी असावा लागतो. पण सर्व समाजामधील माणसे हे या ना त्या रोगाने आजारी पडलेले असतात. त्यामुळेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर यांचा परिणाम पडतो.

     ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देश हा प्रगतीचा शेवटच्या बिंदूवर जावून पोहोचतो म्हणून या सर्व बाबींसाठी आरोग्य महत्त्वाचे असते. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा, आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे . म्हणतात ना “आपले आरोग्य आपल्या हाती” काळजी घ्या स्वत:ची.


स्त्रोत : आरोग्य म्हणजे काय ? माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

वाढत जाणा-या लठ्ठपणामागील कारणं समजत नाहीयेत? मग आहारतज्ज्ञांनी सांगितलेली 'ही' कारणे व उपाय नक्की जाणून घ्या!

     लॉकडाउनची नांदी झाली आणि दुःखात सुख म्हणतात तसे आता घरूनच काम करायचे आहे म्हणून सर्वांनाच छान वाटू लागले. परिस्थिती अर्थात गंभीर होती आणि आहे ती नोकरी टिकते, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आत्तापर्यंत घडू शकले नाही ते वर्क फ्रॉम होम सुरू झाले आणि प्रवास, ट्रॅफिकची कटकट नाही, घरात आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता येईल, आपल्या घरट्यात पिलाबाळांसकट सुरक्षित राहता येईल, या भावनेने मनाला बरेही वाटू लागले. हा आनंद काही काळच टिकला, कारण लॉकडाउन वाढू लागले, तसे कामाचे तासही वाढायला लागले आणि नाश्ता-जेवणाच्या सवयी, पद्धत, प्रमाण बदलून 'वदनी कवल घेता...'ची स्वर्गानुभूती बाजूला राहून वजनाच्या तक्रारी डोके वर काढू लागल्या.

     घरात असल्याने मुले, जोडीदार आणि ज्येष्ठ यांच्या अपेक्षा वाढीस लागल्या. घर आणि ऑफिस याचा समतोल एका हाती साधताना तारेवरची कसरत होऊ लागली. कामाचे वाढलेले तास, विविध शिफ्ट, परदेशात क्लाएंट असल्याने त्यांच्या वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत मीटिंग, कॉल्स सुरू झाले. आधी काम आणि घर हे वेगळे विभाग होते, त्यांची सरमिसळ होऊ लागली. आधी जी जीवनशैली होती, जसे, की जिमला जाणे, धावणे, चालणे, पोहणे एवढेच नव्हे, तर ऑफिसला जाण्यासाठी तयार होणे, बसस्टॉप, कारपर्यंत चालणे, ऑफिसच्या परिसरात फिरणे, जिने चढणे-उतरणे या सर्वांवर बंधने आली. घरे लहान असल्याने तिथेच घरकाम आणि ऑफिसचे काम असल्याने व्यायामासाठी वेगळा वेळ देणे अशक्य होऊ लागले. केवळ दगदग होऊ लागली आणि दगदग म्हणजे व्यायाम नव्हे.

     या तक्रारींची यादी काही संपलेली नाही. व्यायाम, पुरेशी झोप, फिरणे, ठरावीक डबा, नाश्ता करायची वेळ याचे गणित बिघडले. घरी सोफा, झोपाळा, बेड, खुर्ची, किचन असे वाटेल तसे बसून पाठीचा कणा, मान, खांदा यांचे त्रास होऊ लागले. सतत स्क्रीनवर बघून डोळ्यांच्या तक्रारीही वाढल्या. हे सगळे सहन करायचे कारण म्हणजे, आहे नोकरी टिकवायची धडपड. त्यामुळे डेडलाइन, अपुरी झोप या बरोबरच मानसिक ताणही वाढला. व्यवस्थित झोप, योग्य आहार आणि उत्तम व्यायाम ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे; पण तेच कठीण होऊन बसले आहे. एकूणच, या काळात योग्य खाणे, आहार आणि आरोग्य यावर मोठा परिणाम झाला.

कुठे बिघडते?

१. मानसिक ताण असला, की शरीरात 'कॉर्टिसोल' या संप्रेरकाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे संप्रेरकांचा समतोल बिघडून सतत भूक लागणे, गोड खावेसे वाटू लागते.

२. मीटिंग आणि कॉल सुरू असतानाच कधी कधी जेवण करावे लागते. त्यामुळे परिपूर्ण आहार असला, तरी खाण्यातून लक्ष उडते, 'ओव्हर इटिंग' होते किंवा पदार्थ न चावता गिळायला होते. यामुळे साहजिकच वजन वाढणे, अपचन, अॅसिडिटी या तक्रारी वाढतात.

३. उशिरा चालणाऱ्या मीटिंगमुळे रात्री बिस्किटे, मॅगी खा, कॉफी प्या असे प्रकार होतात. तसेच, नवीन पदार्थ करण्याच्या ट्रेंडमुळे गोड आणि तेलकट खाण्याचे प्रमाण वाढीस लागून वजनही वाढते. यावर आता मर्यादा हवी.

४. नैसर्गिक चक्रानुसार आपण उठले पाहिजे, वेळेवर नाश्ता केला पाहिजे आणि जठराग्नी ज्यावेळी व्यवस्थित प्रज्वलित असेल त्यावेळी म्हणजे सूर्य डोक्यावर असताना, तसेच रात्री लवकर जेवणे तितकेच महत्त्वाचे; पण आता जेवणाच्या वेळा पाळणे अवघड झाले आहे. रात्री-बेरात्री खाण्यामुळे निसर्गचक्र बिघडते. यामुळे संप्रेरकांचे असंतुलन, केस गळणे, टक्कल पडणे, पोट सुटणे, पित्त अशा तक्रारी वाढू लागतात.

५. कमी हालचाल आणि इन्फेक्शनच्या भीतीने कमी भाज्या फळे खाल्याने आणि कामात पाणी पिण्याचीही आठवण न राहिल्याने अनेकांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि मूळव्याध याचाही त्रास सुरू झाला. स्वच्छतेची योग्य खबरदारी घेऊन मनातून ही भीती आता कमी करायला हवी.

६. व्यायाम, झोप नीट नसल्याने अनेकांची आळस आणि कामढकल करण्याची वृत्ती तयार झाल्याने तेही आरोग्यास मारक ठरले.

७. जे घरापासून दूर राहत होते, त्यांच्या जेवणाची आणि आहाराची अजूनच आबाळ झाली. आता यावर लक्ष देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे.

'वर्क फ्रॉम होम'मुळे नाश्ता आणि जेवणाच्या सवयी बदलल्या. समोर लॅपटॉपवर काम आणि हातात जेवणाचे ताट हे वेळ वाचवण्यासारखे वाटत असले, तरी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे.

     'वर्क फ्रॉम होम' कदाचित आणखी काही काळ पुढे चालेल, त्यामुळे वेळीच सावध होत आत्तापर्यंत जाणवलेल्या तक्रारींवर तोडगा काढणे आपल्याच हातात आहे.

१. काही जणांनी पोश्चर नीट राहावे आणि पाठ, मान याला त्रास होऊ नये म्हणून टेबल, खुर्ची याची बसायची खास सोय करून घेतली आहे.

२. डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या स्क्रीनची सोय केली.

३. ठरावीक काळाने स्ट्रेचिंग केले तर उत्तम.

४. दिवसातून अर्धा एक तास काढून सूर्यनमस्कार किंवा यू-ट्यूबवर झुंबा किंवा इतर व्यायामप्रकार करावेत, ज्यायोगे मानसिक ताण कमी होईल.

५. काही खावेसे वाटले, तर फळे, लाह्या, मखाणा, फुटाणे तसेच सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया असे पदार्थ तोंडात टाकायला आणून ठेवावेत.

६. ठरावीक काळाने ब्रेक घेऊन शारीरिक आणि मानसिक आराम करावा.

७. ताणतणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम करणे, झोपण्यापूर्वी एक तास कुठलेही स्क्रीन न वापरण्यावर भर द्यावा.

८. स्वतःचे टाइमटेबल आखावे. काम, जेवण आणि व्यायामाच्या वेळा या बाबत आग्रही राहावे.

उदरभरण नोहे...

- जेवणाआधी दीर्घ श्वास घेऊन ऑफिसचा विषय आणि लॅपटॉप दूर ठेवावा.

- सावकाश बसून चावून खावे आणि घरी तयार केलेला परिपूर्ण, ताजा सकस, गरम आहार करावा. त्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे देणे आपल्याला सहज शक्य आहे.

- जेवताना समोर टीव्ही किंवा मोबाइल नसावा.

- कुटुंबासोबत गप्पा मारत आनंदी वातावरणात जेवावे.

- समोर वाढलेल्या अन्नाचा आस्वाद घ्यावा, तरच ते अंगी लागले.

म.टा.

अर्चना रायरीकर

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)


संकलित.

Saturday 30 January 2021

सर्व शिष्यवृत्ती करिता (Scholarships)

आवश्यक कागदपत्रे

इ. 1 ते 12 वी पर्यंत सर्व शिष्यवृत्तीचे आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती खाली दिली आहे


भारत सरकार (मॅट्रीक) शिष्यवृत्ती (इ.11,12 वी

ST मुले/मुली)

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

(ST करीता 2 लाख उत्पन्न मर्यादा)

3.इ.8.9.10./11वी च्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4. राष्ट्रियकृत बँकेचा खालेक्रमांक(विद्यार्थी) 5. आधारकार्ड 6.बैंक आधारलीक


भारत सरकार (मेट्रीकेत्र) शिष्यवृत्ती (इ.11,12 वी SC,NT,SBC,OBC मुले/मुली)

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2,उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

(NT,SBC,OBC करीता 1 लाख व SC 2 लाख मर्यादा)

3.इ.8,9,10/11वी च्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4.नॉन क्रिमलेअर (NT.SBC,OBC) 

5. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक(विद्यार्थी)

6. आधारकार्ड 7.बैंक


Post-Matric Scholarship

(10 वी नंतर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती)

 income Certificate (rreta Templet)

 Students Decleration

 SSC Marklist 6.Bonafide 

Bank Pass Book 

Community certificate(स्वलीखीत ) 

Course & Adm.Fees

Passport 

Aadhar Card


Pre-Matric Scholarship

(इ.सने 10 ती अल्पसंख्यांक firt 

Passport

 Aadhar Card

 Income Certificate (tta Templet) 

Students Decleration 

Bonafide

 Previes Accaderic Marklist

 Community Certlicate(era Templet) 

Course & Fees

Bank Pass Book

SSC Board परीक्षा फी


(इ.10 वी मधील SC,ST,NT& SBC विद्यार्थी) 

1. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक विद्यार्थी)

 2. आधारकार्ड

 3.बँक आधारलींक

(SSC Exam परीक्षेला बसणे आवश्यक आहे.)


NTS परीक्षा (इ.10 वी सर्व मुली/मुली)

1.जातीचे प्रमाणपत्र (फी सवलत हवी असल्यास)

2.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3. फोटो 2

4. आधारकार्ड

(पात्र ठरल्यास 2 वर्ष स्कालरशिप मंजूरी


NMMS परीक्षा (इ.8 वी सर्व मुली/मुली)

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

2. फोटो 2

3. उत्पनाचा दाखला (रू.1,50,000 पर्यंत)

4. आधारकार्ड

( पात्र ठरल्यास 2 वर्ष स्कालरशिप मंजूर


मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (इ.9,10 वी SC मुले/मुली)

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार) 

3.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

5. आधारकार्ड

6.बँक आधारलीक


राष्ट्रिय प्रोत्साहन भत्ता (इ.9 वी SC/ST मुली)

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

2. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक(विद्यार्थी)

3. आधारकार्ड

4.बैंक आधारलीक

(SSC Exam. उत्तीर्ण होणे आवश्यक आहे


पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.5वी)

1. पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र असलेली गुणपत्रिका

2. मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3. आधारकार्ड

4. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

5. बँक आधारलींक


माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.8 वी)

1. माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र असलेली गुणपत्रिका

2. मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3.आधारकार्ड

4.राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

5. बँक आधारलींक


अस्वच्छ व्यवसाय करणारया पालकांच्या पाल्याकरीता शिष्यवृत्ती

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी/पालक)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

3.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत 

4.व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामपंचायत)

5. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

6. आधारकार्ड

7.बँक आधारलींक


शालेय गुणवत्ता शिष्यवृत्ती

इ. 5 ते 10 वी मधील - SC,NT, SBC या

सवर्गातून गुणानुकर्म प्रत्येक वर्गातून विद्यार्थी

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

2.आधारकार्ड

3.राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी


सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

(इ. 5 ते 10 वी, SC,NT,SBC मुली)

1. आधारकार्ड

2. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक(विद्यार्थी)

3. बँक आधारलींक


संकलित.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने:अंगणवाडी व बालवाडी यंदा बंदच...

     नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणे पसंत केल्याचे चित्र आहे. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. प्रतिबंधात्मक लसही आली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यानंतर आता राज्याची परिस्थिती पाहून १ मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.नुकत्याच दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत.

     त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ४० टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला आहे. २५ टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

     पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या, तूर्तास अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नाही. आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (१ मार्च ते ३० एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे.

     त्याबाबत १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कठीण काळातही शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वजण उत्तम काम करत असून आजवर एकही मुलगा कोरोनाच्या विळख्यात सापडला नसल्याचे यावेळी त्यांनी प्रशंसा केली.


संकलित.

Friday 29 January 2021

आनापान ध्यान साधना ( मराठीत )

     आपल्या मनातील चिंता, क्रोध, द्वेष, एकाग्रतेचा अभाव, शंका, आळशीपणा, लोभ, अस्वस्थता इत्यादी विविध अडथळ्यांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आनापान हे एक प्रभावी साधन आहे.

     Join - आनापान ध्यान साधना प्रशिक्षण इ.५वी ते इ.१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत

    सुरुवातीच्या 70 मिनिटांच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर शालेय मुले शाळा सुरू करण्यापूर्वी दररोज १० मिनिटे या तंत्राचा अभ्यास करू शकतात आणि घरी जाण्यापूर्वी दहा मिनिटांसाठीही हा सराव पुन्हा करू शकतात.

आनापान ध्यान साधना कशी करतात? 

     आनापान प्रशिक्षणात सहभागींनी त्यांचे नाकपुडीच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष केंद्रित करून येणारा श्वास आणि जाणारे श्वास यावर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. श्वासोच्छवासाचा प्रवाह बदलण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करावे.      अशाप्रकारे, त्यांना आत्म-जागृतीच्या सुरुवातीच्या चरणांचा अनुभव येतो. हे तंत्रज्ञान कोणत्याही कल्पनाशक्ती किंवा मूल्यांकनाशिवाय, निरिक्षण आधारित आणि वैज्ञानिक आहे. हे तंत्र "अनापान" म्हणून ओळखले जातेजाते. 

आनापान सति ध्यान

 ‘अना’ म्हणजे आत येणारा श्वास आणि ’अपान’ म्हणजे बाहेर जाणारा श्वास. सति म्हणजे सजगता 


वाचा - आनापान मित्र उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 


आनापान ध्यान साधना करण्याचे फायदे :-

1- मन एकाग्र(concentrate) होण्यास मदत होते. 

2- मनातील भिती, चिंता, ताणतणाव दूर होतात. 

3- घबराहट(nervousness) नैराश्यचे प्रमाण कमी होते. 

4- अभ्यासात मन लागते. चांगले लक्षात राहते. 

5- विविध प्रकारचे खेळ, कला यामध्ये कौशल्य प्राप्त करण्यास मदत होते. 

6- काहीही समजून घेण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची शक्ती वाढते.

7- स्वतः मध्ये आत्मविश्वास (self confidence) निर्माण होतो. 

8- जाणीव जागृती (awareness) वाढते. कोठे कसे वागावे बोलावे याचे ज्ञान प्राप्त होते. 

9- परस्पर समरसता वाढते.

10- मन खूप परिपक्व (powerful) होते. 

11- एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होते. 

     मुलांना हे फायदे मिळवण्यासाठी दिवसातून दोनदा नियमित व्यायाम 10-15 मिनिटांसाठी करणे आवश्यक आहे.


आनापान विषयी अधिक माहिती :-

1) आनापान मुळे मन आनंदी, शांत आणि एकाग्र राहते. 

2) हे सोपे आणि वैज्ञानिक तंत्र आहे. 

3) ते कोणत्याही धर्मावर आधारित नसून नैतिकतेवर आधारित आहे. 

4) हे ध्यानाच्या नैसर्गिक उद्दीष्टाचा आधार आहे.


संकलित.

आनापान ध्यान साधना प्रशिक्षण. इ. ५वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १०

     कोविडच्या काळामध्ये राज्यातील दोन लाखापेक्षा अधिक शिक्षकांनी स्वतःहून आनापान हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामध्ये शिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारचे अभिप्राय नोंदवून आनापान साधनेची दैनंदिन जीवनात किती आवश्यकता आहे याचे महत्त्व विषद केलेले आहे.


वाचा - आनापान ध्यान साधना कशी केली जाते? आनापान करण्याचे फायदे कोणते? 


वाचा - आनापान मित्र उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 

     आनापान साधनेची उपयुक्तता लक्षात घेवून राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इ. ५ वी ते इ. १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आनापान साधनेचे प्रशिक्षण रविवार, दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते १० या वेळात दिले जाणार आहे. सदरचे प्रशिक्षण मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून होणार आहे. आपण आपल्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका भाषेच्या प्रशिक्षणात संबंधित लिंक वापरून सहभागी होऊ शकता. यात पालक तसेच शिक्षकही सहभागी होऊ शकतात.

     विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. प्रशिक्षणाला शक्यतो शांत, एका जागी जमिनीवर मांडी घालून बसावे.


मराठीतून प्रशिक्षणासाठी लिंक

https://youtu.be/4OnTMrjdTug


हिंदीतून प्रशिक्षणासाठी लिंक

https://youtu.be/07gzycVpQTc

 

इंग्रजीतून प्रशिक्षणासाठी लिंक

https://youtu.be/vTEFobwTzRM


     सर्वांना विनंती करतो की, हा मेसेज सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवावा. सर्व विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी होतील.

धन्यवाद.🙏


संकलित.

आनापान ध्यान साधना - मित्र उपक्रम

     आनापान मित्र उपक्रम हा महाराष्ट्र सरकार, विपश्यना संशोधन संस्था (व्हीआरआय) आणि विपश्यना केंद्रांचा संयुक्त उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांच्या निरोगी, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी मदत करतो.

     MITRA म्हणजे MIND IN TRAINING for RIGHT AWARENESS. यालाच हिंदी मध्ये दोस्त तर मराठी मध्ये मित्र असे म्हणतात. 

वाचा - आनापान ध्यान साधना कशी केली जाते? आनापान करण्याचे फायदे कोणते?  

     नैसर्गिक पद्धतीने योग्यप्रकारे श्वसन करणे, जाणीव जागरुकता निर्माण करणे, हे मित्र उपक्रमाचे सार आहे. 

     विद्यार्थी आपल्या नाकपुडीच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष देऊन नैसर्गिक सामान्य येणारा श्वास आणि जाणार्‍या श्वासाचे निरीक्षण करणे शिकतात. ते, कोणतीही कल्पनाशक्ती किंवा मूल्यमापन न करता, प्रवाह बदलण्यास, नियमनात आणण्यासाठी किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता सहजपणे त्यांचा नैसर्गिक श्वास घेतात. सेल्फ-अवेयरनेसची ही प्रारंभिक पायरी आहेत. 

Join - आनापान ध्यान साधना प्रशिक्षण इ.५वी ते इ.१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत

     हे तंत्रज्ञान कोणत्याही कल्पनाशक्ती किंवा मूल्यांकनाशिवाय, निरिक्षण आधारित आणि वैज्ञानिक आहे. हे तंत्र "अनापान" म्हणून ओळखले जाते, जिथे ‘अना’ म्हणजे आत येणारा श्वास आणि ’अपान’ म्हणजे बाहेर जाणारा श्वास.

     दिवसा, कोणत्याही वेळी आणि कोणाकडूनही जाती, पंथ, धार्मिक श्रद्धा आणि श्रद्धा, लिंग किंवा वय यांचे कोणतेही बंधन किंवा निर्बंध न घेता आनापनाचा अभ्यास केला जाऊ शकतो.


संकलित.

Thursday 28 January 2021

या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय.

     कधी कधी फोनमधील हार्डवेअर स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअरसोबत यूजर्सकडून केली जाणारी छेडखानीही याचं कारण असू शकते. चला जाणून घेऊया स्मार्टफोन हॅंग किंवा स्लो का होतात? काय आहेत त्यावरील उपाय?

  मंबई : स्मार्टफोन जेव्हा जुना होतो तेव्हा फोन स्लो होणे किंवा हॅंग होणे अशा समस्या होतात. त्यामुळे काहींना फोन पुन्हा पुन्हा रिस्टार्ट करावा लागतो. ही समस्या केवळ जुन्याच फोनमध्ये होते असे नाहीतर काही नव्या फोनमध्येही होते. यांची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी फोनमधील हार्डवेअर स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअरसोबत यूजर्सकडून केली जाणारी छेडखानीही याचं कारण असू शकते. चला जाणून घेऊया स्मार्टफोन हॅंग किंवा स्लो का होतात? काय आहेत त्यावरील उपाय?


1) रॅम कमी असणे :


मार्केटमध्ये आता 8 जीबी रॅम असलेले फोनही उपलब्ध आहेत. रॅम जास्त जीबीची असल्याने मल्टीटास्किंग दरम्यानही फोन स्लो किंवा हॅंग होत नाही. फोन रिस्टार्ट करण्याचीही गरज पडत नाही. पण जेव्हा विषय 4 ते 5 वर्ष जुन्या स्मार्टफोनमधील 512 एमबी ते 1 जीबी रॅमचा येतो तेव्हा मेमरी कमी होऊ लागते. यातील मल्टीटास्किंगमुळे फोन स्लो आणि हॅंग होतो. 


काय करावे?


ज्या फोनमध्ये रॅम कमी असते त्यात डेटा कमी असायला हवा. त्यासोबतच केवळ कामाचेच अॅप इन्स्टॉल करा. जास्त स्पेस घेणारे अॅप इन्स्टॉल करु नका. 


2) अॅप तसेच ओपन ठेवणे :


ही चूक जवळपास सगळ्याच यूजर्सकडून केली जाते. जेव्हाही एखादं अॅप ओपन केलं जातं ते वापरल्यानंतर बंद करण्याऐवजी अनेकजण बॅक करतात. त्यांना वाटतं की अॅप बंद झालं. पण ते अॅप केवळ मिनिमाइज होऊन बॅकग्राऊंडमध्ये ओपन राहतं. त्यामुळेही फोन स्लो होतो. 


काय करावे? 


जेव्हाही एखाद्या अॅपचा तुम्ही वापर करता तेव्हा ते वापरल्यानंतर  योग्यप्रकारे बंद करा. यासाठी एन्ड की वर टॅप करा. काही फोनमध्ये हे काम वेगळ्या की ने केले जाते. 


3) अॅप्लिकेशन अपडेट करणं:


तुमच्या फोनची रॅम 521 एमबी किंवा 1 जीबी असेल आणि मेमरी 4 जीबी किंवा 8 जीबी असेल, तर फोनमधील इन्स्टॉल अॅप अपडेट करु नका. फोनची इंटरनल मेमरी ऑपरेटींग सिस्टम आणि अॅप्ससाठी वेगळी असते. म्हणजे यूजर्सना कधीही पूर्णपणे मिळत नाही. अशावेळी तुम्ही जेव्हाही अॅप अपडेट करता तेव्हा मेमरीची स्पेस आणखी खर्ची होते. त्याचप्रमाणे अॅप्स अपडेट झाल्याने जास्त रॅम कंज्यूम होते. त्यामुळे फोन स्लो होतो. 


काय करावे? 


फोनमध्ये केवळ तेच अॅप अपडेट करा जे तुमच्या कामाचे आहेत. ज्याचा तुम्ही रोज वापर करता. अॅप्सच्या ऑटो फीचर अपडेटला प्ले स्टोर सेटिंगमध्ये जाऊन ऑफ करा. 


4) कॅशे क्लिअर न करणे: 


कॅशे (CACHE) बाबत कदाचित अनेक यूजर्सना माहीत नसेल. जेव्हाही आपण अॅपचा वापर करतो तेव्हा त्या अॅपशी निगडीत टेम्पररी डेटा स्टोर होतो. यालाच कॅशे म्हटले जाते. यामुळे हा डेटा फोनची रॅम कंज्यूम करतो. तसेच मेमरीची स्पेसही घेतो. त्यामुळे हा कॅशे डेटा आठवड्यातून एकदा क्लिअर करायला हवा. 


काय करावे? 


फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अॅप्समध्ये जावे. कोणत्याही अॅपच्या आत गेल्यावर तुम्हाला क्लिअर कॅशे आणि क्लिअर डेटा असे दोन पर्याय दिसतात. त्यातील कॅशे क्लिअर करायला हवे. 


5) APK फाइल इन्स्टॉल करणे :


अनेक असे अॅप्स असतात जे प्ले स्टोरवर उपलब्ध नसतात. असे अॅप्स थर्ड पार्टी किंवा APK फाइलच्या मदतीने फोनमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात. हे फारच धोकादायक असतं. यामुळे फोन स्लो आणि हॅंग होतो. सोबतच यामुळे डेटा लिक होण्याचीही शक्यता असते. 


काय करावे? 


कधीही थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करु नका. केवळ तेच अॅप इन्स्टॉल करा जे गुगल प्ले स्टोरमध्ये उपलब्ध असतील. कधीही वाय-फाय किंवा ब्लूटूथच्या मदतीने अॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल करु नका. 


6) अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅपचा वापर : 


काही यूजर्स असे मानतात की, फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप इन्स्टॉल करुन फोनची स्पीड वाढवली जाते. पण असे काहीही नाहीये. अॅंटीव्हायरसमुळे फोनच्या सिक्युरिटीवर जास्त प्रभाव पडत नाही. दुसरीकडे या अॅपमुळे फोनच्या मेमरीची स्पेसही खर्ची होते. 


काय करावे? 


तुमच्या फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप असतील तर ते लगेच अनइन्स्टॉल करा. 


7) मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर : 


फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये स्पेस निर्माण करण्यासाठी काही यूजर्स मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करतात. असे केल्याने इंटरनल मेमरीमध्ये तर स्पेस निर्माण होते, पण फोनची बूटिंग प्रोसेस वाढते. जेव्हा अॅप्सना मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर केले जाते तेव्हा ते अॅप्स ओपन केल्यावप फोन मेमरी कार्डला सर्च करतं. कारण हे मेमरीचं सेकंड प्लॅटफॉर्म असतं त्यामुळे फोन याला रिड करण्यात थोडा वेळ घेतो. 


काय करावे? 


मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करु नये. त्याऐवजी फोनमधील व्हिडीओ, ऑडिओ किंवा इतक फाइल मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर कराव्यात. 


8) व्हॉट्सअॅप फाइल :


तुमच्या व्हॉट्सॲपवर फोटो आणि व्हिडीओसोबतच GIF, PDF, कॉन्टॅक्ट, ऑडिओ या इतर फाइलही येतात. यूजर्स या फाइल पाहतात, ऐकतात पण डिलिट करत नाहीत. इतकेच नाहीतर या फाइल जितक्यांदा फॉरवर्ड केल्या जातात तितकी जास्त स्पेस खर्ची होते. म्हणजे फोनची मेमरी यामुळे दुप्पट भरली जाते. 


काय करावे? 


व्हॉट्स च्या मीडियामध्ये जाऊन त्या फाइल लगेच डिलिट करा. त्यासोबतच सेंड मीडियामध्ये जाऊन फाइल्स डिलिट करा.  


संकलित ऑनलाइन (लोकमत)

Wednesday 27 January 2021

 *सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही.*


 *भाग 1*


शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेन *त्याचा आत्माच....!*

त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे.

सेवा पुस्तिका अद्यावत करणे व जपुन ठेवणे ही जबाबदारी कर्मचा-याच्या वरिष्ठ कार्यलायाची म्हणजे प्रा.शिक्षक असेल तर पंचायत समिति ची.

माध्यमिक शिक्षक असेल तर प्रशालेची.

परंतु पंचायत समिती स्तरावर शिक्षक कर्मचा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व तेथे हे काम पाहणा-या कर्मचा-यांची संख्या तोकडि पडत असल्यामुळे व इतर कामांचेच प्रमाण जास्त असल्यामुळे सेवापुस्तिका अद्यावत व परिपूर्ण केल्या जात नाही.

हे जरी सत्य असले तरी स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक अाहे.

याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवा निव्रुत्ति जवळ येते त्यावेळेस जाणवतो.

त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.

प्रशालेच्या स्तरावर मात्र सेवापुस्तिका ब-यापैकी अद्यावत असतात कारण तेथे शिक्षकसंख्या मर्यादित असते व  स्वतंत्र लिपिक असल्यामुळे एवढि अडचण नसते .

दुसरे महत्वाचे म्हणजे कर्मचा-याला पाहिजे तेंव्हा सेवापुस्तिका पाहता येते व वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी करण्याविषयी सांगुन सेवापुस्तिका अद्यावत करुन घेता येते.

असं पंचायत समिती स्तरावर कर्मचा-याला  करणे शक्य होत नाही.

तरी पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा कर्मचा-याने  सेवापुस्तिका हातात आल्यावर नोंदी अद्यावत केल्या कि नाही याविषयी खात्री करणे.

एवढे जरी आपण  केल तरीे भविष्यात होणारा त्रास आजच आपण टाळु शकतो.


  *सेवानिव्रुत्ती वेतन*


जे जे आपणासी ठावे......!!!!


मागच्या मे महिण्यात कुंभेफळ केंद्रातील श्रीम.कुंदा कुलकर्णी यांचे सेवानिव्रुत्तीला अवघे ४/५ महिने बाकी असतांना आकस्मिक निधन झाले.

मागे फक्त त्यांचे आजारी सेवानिव्रुत्त पती.

श्रीम.कुलकर्णी यांच्या एका मैत्रिणीने family pension च्या कार्यवाही साठी प्रयत्न सुरु केले.

मूळ सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) हातात पडल्यावर आणि त्याची तपासणी केली असता तब्बल ३० ते ३५ नोंदी अपुर्ण असल्याचे निदर्शनास आले.त्यापैकी  काही नोंदी जालना जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या .

या सर्व नोंदी पुर्ण झाल्याशिवाय त्यांच्या आजारी पतिला family pension मिळणे अशक्य आहे.

आता यक्षप्रश्न असा की, या *अपुर्ण नोंदी पुर्ण करायच्या कशा?*

*त्या साठी कागदपत्र मिळवायचे कुठुन? ?*

*दुस-या जिल्ह्यात जावुन संबंधित अधिका-याच्या सह्या घ्यायच्या कशा?*

प्रसंग सांगायचे तात्पर्य जर या सगळ्या नोंदी वेळिच संबंधित कार्यालयाने पुर्ण केल्या असत्या तर कुलकर्णी कुटुंबावर आज नोंदी पुर्ण करण्यासाठी व family pension साठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली नसती.

शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामूळे व कार्यालयात असणारी  लिपिक मंडळीची मानसिकता यामुळे सेवा पुस्तिका अपुर्ण राहतात.

आणि मग अशी काही एखादी अप्रिय घटना घडली तर कुटुंबाला  आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

सेवा पुस्तिका पुर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारि प्रा.शिक्षकांच्या बाबतीत पंचायत समिती आणि माध्य.शिक्षकांच्या बाबतील प्रशाला कार्यालयाची असते पन आपलंही कर्तव्य आहे कधी तरी त्याविषयी चो्ैकशी व खात्री करणे. वेळ निघुन गेल्यावर काहीच करता येत नाही आणि कोणाविरुद्ध तक्रारही करता येत नाही.

म्हणुन प्रत्येकाने आपल्या सेवा पुस्तिके विषयी सजग राहिले पाहिजे असं मला वाटतं........कारण कोण दिवस येई कसा कोण जाणतो....??

( सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा)


*भाग दुसरा*


*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......* 

 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇

१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*.

गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात..

१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे 

२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.

३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.

४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे

५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.

६.गटविमा नोंदिवर गशिअ/

    मुअ यांची स्वाक्षरी नसणे

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात

यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना   वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.

त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या   नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.

( सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा)


*भाग  तिसरा*


*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......* 


 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे *कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी*.

*कर्मचा-याची बदली झाल्यानंतर  त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद अादेश क्रमांकासह व दिनांकासह  सेवापुस्तिकेत असणे अावश्यक आहे.*

सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.

१. कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद  सेवापुस्तिकेत नसणे.

२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.

३.  नोंद घेतलेली असते पन त्यावर गशिअ  ची स्वाक्षरी नसणे.

४.कधि कधि कार्यमुक्ती ची नोंद असते पन उपस्थितिची नोंद नसणे

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  बदली झालेल्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिव्रुत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवुन प्रस्ताव परत केला जातो.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलिच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.

सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा.



  *भाग  चौथा*

*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......* 

 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे

 *वारसाबाबत   नामनिर्देशन*

*अाजच्या बेभरवशाच्या  काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्या मुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर  सेवापुस्तिकेत  नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढिल मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद  असणे अावश्यक आहे.*

*अापण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास सहा महिण्यानंतर  ते बदलू शकतो* 

*सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.*

१. नामनिर्देशाना ची नोंद  

     सेवापुस्तिकेत नसणे.

२.  चार प्रकारच्या 

       नामनिर्देशन 

      नोंदी पुर्णनोंद नसणे.

३.  नोंद घेतलेली असते पन 

      त्यावर गशिअ  / मुअची 

      स्वाक्षरी नसणे.

४.सुरुवातिला केलेल्या

   नामनिर्देशनात कालांतराने 

  वारसाच्या नावात बदल 

  अथवा वारसात बदल 

   झाला असेल तर त्याबाबत 

   नोंद अद्यावयत नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशना बाबतच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*            



*भाग* 6⃣


*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*

 *पुढे येणा-या काही महिण्यात                कर्मचा-यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी  होणार अाहे ....!*

        👇

*१. सातवा वेतन अायोग.*

येत्या काही महिण्यात सर्वांना बहुप्रतिक्षित असा सातवा वेतन आयोग लागु होणार असल्यामुळे जर मुळवेतना बाबतच्या काही त्रुटी असतिल तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.

त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.

*अागामी वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचुक होण्यासाठी वेतनाबाबत च्या त्रुटी काळजीपुर्वक वरिष्ठ कार्यालयाकडुन पुर्ण करुण घेणे आवश्यक अाहे .*

*त्यासाठी महत्वाचे म्हणजे*

*जि.प.च्या वित्त विभागाकडुन सेवापुस्तिकेची अाज पर्यंत मिळालेल्या *सर्व वेतन अायोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे.वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.*

*वरिल सर्व बाबिंची पडताळणी झालेली असेल अाणि पडताळणीत जि.प.लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व अाक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच*

*२.सर्व्हिस बुक online*

दुसरी महत्वाची बाब म्हणजे येणा-या काही महिण्यात सेवापुस्तिका online होणार अाहे.

त्यामुळे सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.

परीणामी  कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.

*यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळिच दुरुस्त होणे गरजेचे अाहे.*             


  *भाग 7⃣ *बदली विशेष*

*बदली झाल्या नंतर  सेवापुस्तिका नविन कार्यालयात जमा करण्यापुर्वी.....  अत्यंत महत्वाचे*

१. मूळ सेवा पुस्तिकेत 

   कार्यमुक्तिबाबत सविस्तर   

     नोंद व 

     मा.गशिअ यांची स्वाक्षरी 

     असल्याबाबत खात्री 

       करणे.

२. यापूर्वि  केलेल्या नोंदींवर 

    मा.गशिअ यांची स्वाक्षरी

        असल्या बाबत खात्री   

        करणे.

     उदा. गटविमा नोंद

            नामनिर्देशन नोंद

            रजा मंजुरि नोंद

             प्रशिक्षण नोंद

             जादा अदाई वसुलि.

           स्थायित्वा बाबत नोंद

      मराठि/हिंदी परीक्षा सुट.

३. कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत 

     रजेचा हिशोब पुर्ण    

   असल्याबाबत खात्री करा .

४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत 

     सेवा पडताळणी बाबत 

     नोंद असल्याची खात्री 

      करा 

५. ज्या शाळेवर उपस्थित झाले त्या बाबत अादेश क्रमांका सहित सविस्तर उपस्थिति बाबत नोंद मूळ सेवा पुस्तिकेत करवून घ्या.

६. L.P.C. वर स्वता:चा 

    शालार्थ ID असल्याबाबत 

    खात्री करा.

*७.अत्यंत महत्वाचे*

   *माहे फेब्रु..२०१८ च्या

   वेतनातुन वै.अपघात विमा 

   वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.*

८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.

उदा.   Mscit रिकव्हरी

         5.5.10 नुसार रिकव्ह

          गटविमा फरक.इ.


*धन्यवाद.....!!!!*                 


*भाग* 8⃣

*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......* 

*चट्टोपाध्याय अायोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ??*

*साधारण पणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. अाणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटि पुर्ण केल्या नंतरच ..*

*मागच्या वर्षी   शासनाने काढलेल्या २३ अाक्टो २०१७  मधील चट्टोपाध्यायच्या  सुधारीत जी.आर. मधील नियम व अटी बघितल्या तर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा  निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही.*

*विशेष करुन संभ्रम पडतो  तो  निवडश्रेणी बाबत.*

*उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्या तरच.*

*परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी  ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.*

*याचे कारण असे की , ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी अाहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० अाहे.*

*वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो की,  मी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा  माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून  मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत  झाली .मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ????*

*तर वरिल प्रश्नाचे उत्तर  राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही* 

*याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचा-याला दोनदा चट्टो.वरिष्ठश्रेणी देता येत नाही.*

*प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० अाहे.*

*अाणि  प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक  शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००*

*असल्यामुळे वरिल प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित नियमानुसार तरी कोणतिही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.*

माहितिस्तव 👇👇

**********************       *प्राथमिक शिक्षक*


*मुळवेतन श्रेणी*

 *ग्रेड पे -२८००*


*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे  ४२००*


*निवडश्रेणी ग्रेडपे ४३००*


**********************


*प्रा.प.शि./ मुअ/माध्य.शिक्षक*


*मुळवेतन श्रेणी*

 *ग्रेड पे -४३००*


*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे  ४४००*


*निवडश्रेणी ग्रेडपे ४८००*

*.........धन्यवाद!!!        



*भाग*    9⃣  

*वैद्यकिय प्रतिपुर्ती विशेष*******

*(मेडिकल फाईल)*

*कर्मचा-याच्या जिव्हाळ्याचा अजुन एक महत्वाचा विषय म्हणजे वैद्यकिय प्रतिपुर्ती प्रस्ताव*

*कारण प्रत्येकाला कधि न कधी दवाखाण्यातील भरमसाठ  खर्चाचा अाकस्मिक सामना करावा लागतोच*

*या विषयी  पूर्ण माहिती नसल्यामुळे  व प्रस्ताव तयार करतांना त्यामधे त्रुटी राहिल्यामुळे कर्मचारी बरेचदा या  शासनाच्या योजनेपासुन वंचित राहतो.*

*त्यामुळे अाज या योजनेबद्दल थोडेसे महत्वाचे......!*

*शासन निर्णय सा.अारोग्य विभाग दि.१९/३/२००५ च्या सहपत्रानुसार शासनाने या योजनेसाठी २७ अाकस्मिक अाजार व ५ गंभीर  आजाराची यादी घोषित केलेली अाहे.*

*वरिल यादितिल अाजारासाठी        कर्मचा-याने  आपल्या कुटूंबातिल एखाद्या सदस्याला  दवाखान्यात  दाखल करुन खर्च केला असेल तर अाजाराच्या स्वरुपानुसार ९० ते १०० टक्क्यापर्यंत खर्च कर्मचा-याला वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या रुपाने परत मिळु शकतो.*

*या साठी खालिल गोष्टी महत्वाच्या*

               ⬇

*१.वरिल यादीतिल २७ किंवा ५ या पैकिच अाजार असावा.*

*२ रुग्णाला दवाखान्यातुन डिस्चार्ज झाल्यापासुन १ वर्षाच्या अात वैद्यकिय प्र.प्रस्ताव जि.प.ला अथवा कर्मचा-याच्या वरिष्ठ कार्यालयाला दाखल करणे अावश्यक.*

*३.अारोग्य विमा कार्यालयाकडुन अथवा धर्मदाय संस्थेकडुन या बाबतचा खर्च  दवाखान्याला अदा करण्यात आला असेल तर प्रस्ताव दाखल करता येत नाही .*

*४.विहित नमुण्यातिल साधारणपणे ३०/४० पेजेसचा हा प्रस्ताव पुर्ण करुण डिस्चार्ज झाल्यापासुन एक वर्षाच्या अात दाखल करणे अावश्यक.*

*५.    रु.१०००००/*              

     *(एक लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.E.O.यांना अाहे.*  

 *६* *रु.३०००००(तीन लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.C.E.O.यांना अाहे.*

*७* *रु.३०००००(तीन लाख) च्या पुढील  वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मंत्रालय मुंबई यांना अाहे.*

*८. प्रस्ताव तयार करतांना महत्वाचे म्हणजे प्रस्ताव* *त्रुटी विरहित असावा जेणेकरुन वारंवार परत येणार नाही.*

*म्हणुन अनुभवी व जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने सदरील प्रस्ताव तयार करुन सादर करावा.*

*हे सगळे करत असतांना व कागदपत्रांची जमवाजमव करतांना ,प्रस्ताव मंजुर होईपर्यंत बराच त्रास होतो.*

*परंतु शासन cashless योजना लागु करेपर्यंत याला काहीच पर्याय नाही.*

 *अाणि त्रासाशिवाय पैसा मिळत नाही हे पन सत्य  ...!*

*धन्यवाद........!*



*भाग* 1⃣1⃣ (अ)

*सेवानिव्रुत्ती वेतन(पेंशन) विशेष...!*

*सेवानिव्रुत्ती नंतर अनेक कर्मचारी पेंशनसाठी कार्यालयात अापल्याला खेट्या घालतांना दिसतात तरिही महिनो न महिने पेंशन मिळत नाही याचे कारण म्हणजे सेवापुस्तिकेतिल त्रुटी व पेंशन प्रस्तावातिल त्रुटी.*

*वेळेवर पेंशन मंजुरीसाठी खालिल काही गोष्टीची काळजी घेतली तर कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही.*

*प्रस्तावात अाढळुन    येणा-या काही महत्वाच्या त्रुटी.* 👇👇👇

*१.वयाबाबत क्षमापन......*

एखादा कर्मचारी शासनाने विहित केलेल्या वयाच्या मर्यादे पेक्षा अधिक वयानंतर सेवेत प्रविष्ठ झाला असेल तर अधिकच्या वयाबाबत क्षमापन करुन घेणे व त्याबाबत नोंद घेणे अावश्यक असते.

उदा. खुल्या प्रवर्गा साठी वयाची मर्यादा २८ वर्ष असेल   अाणि २९ वर्षानंतर  कर्मचारीसेवेत प्रविष्ठ झाला असेल तर १ वर्षाचे वयक्षमापन मा.मुकाअ मार्फत मा.विभागिय आयुक्तांकडुन करुन घ्यावे लागते.

*अनुकंपा धर्तीवर एखादा कर्मचारी सेवेत आला असेल तर त्यासाठी वयक्षमापनची अावश्यकता नाही परंतु नियुक्ती  आदेशात अनुकंपाबाबत उल्लेख असावा आणि सेवापुस्तिकेत तशी नोंद असावी.*

*२.तांत्रिक खंडाबाबत क्षमापन*.....!

एखाद्या कर्मचा-याला सेवेत प्रविष्ठ झाल्यानंतर मधेच काही दिवसाचा खंड दिला असेल तर तेवढ्या दिवासाचा खंड क्षमापित करुन घ्यावा लागतो. खंडाच्या काळातील रजा मंजुर करुन तशी नोंद घेणे गरजेचे असते.

*३.पदोन्नती बाबत विकल्प.*

पदोन्नती घेतली असेल तर त्याबाबतचे विकल्प फार्म सेवापुस्तकेत दिसुन नाही.

खास करुन मुअ/केंप्र/ शिविअ इत्यादि.

विकल्प नसेल तर पुन्हा विकल्प फार्म भरुन सेवापुस्तिकेत जोडणे अावश्यक.

*४.वेतन पडताळणी  मधील अाक्षेप*.....

वेळोवेळी करण्यात आलेल्या वेतन पडताळणीत काही अाक्षेप नोंदवले असेल तर त्याची पुर्तता करणे गरजेचे  .

उदा. पुनर्वेतन निश्चिती करणे, जादा अदाई अदा करणे.

त्याबाबत आवश्यक त्या नोंदी करणे.व जादा अदाईबाबत विवरणपत्र दोन प्रती मधे सोबत जोडणे आवश्यक.

*५. संगणक परीक्षा( MSCIT) सुट*

वय वर्ष ५० पुर्ण झाले असेल अाणि संगणक परीक्षा उत्तीर्ण नसेल तर त्याबाबत सुट घेवुन तशी नोंद घेणे गरजेचे.

*भाग ११ ची उर्वरीत पेंशनबाबत माहीती पुढच्या ११ ब या भागात.....!*

*.........धन्यवाद!!!*

Tuesday 26 January 2021

क्लाऊड स्टोरेज : ड्रॅापबॉक्स


        प्रथम क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय ते पाहूया. आज काल पेनड्राईव घेऊन फिरणे ओल्ड फॅशनेबल मानले जात आहे. ज्याप्रकारे भारतात इंटरनेटचा प्रसार झाला त्या प्रमाणे फिजिकली डेटा घेऊन फिरणे मागासपानाचे लक्षण मानले जात आहे. आता तुम्ही ऑनलाईन डेटा साठवू शकता आणि शेअरपण करू शकता.
        क्लाऊड स्टोरेजचा मुख्य सिद्धांत म्हणजे कि आपल्या सिस्टम  मध्ये किंवा एक्सटर्नल डिस्क मध्ये डेटा स्टोअर करण्याऐवजी ऑनलाइन सेव करणे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि पद्धत अतिशय सुरक्षित आहे. ज्या प्रमाणे आपले इमेल्स आपणच पाहू शकतो तसेच यामध्ये आपल्या फाईल्स फक्त आपण पाहू शकतो. जर तुम्हाला एखादी फाईल जर कुठे पाठवायची असेल तर फक्त एका क्लिक वर शेअर करू शकता.
        इंटरनेट वर अश्या अनेक साईट आहेत ज्या क्लाऊड स्टोरेज सेवा पुरवतात. या साईटवर आपल्याला एक खाते काढावे लागते मग युजरनेम व पासवर्ड तयार करावा लागतो. सुरक्षेच्या आणि फीचर्स च्या दृष्टी ने ड्रॅापबॉक्स ची सेवा सर्वोत्तम आहे. सोपा इंटरफेस आणि पुरेशी स्टोरेज यामुळे ड्रॅापबॉक्स चांगलेच प्रसिद्ध आहे. ड्रॅापबॉक्स मध्ये आपल्याला 2 GB ची स्टोरेज मिळते. तुम्ही ती 18 GB पर्यंत वाढवू शकता. मला वाटते कि प्रत्येकाने  ड्रॅापबॉक्स वापरण्यास सुरुवात केळी पाहिजे. निदान आपली महत्वाची डॉक्यूमेंटस, फोटोज, वीडीओ अशी अतिशय वैयक्तीक माहिती तुम्ही यावर स्टोअर करू शकता. सध्यातरी इंटरनेटवर ड्रॅापबॉक्स हून सुरक्षित स्टोरेज उपलब्ध नाहीये.

ड्रॅापबॉक्स वर 2GB जागा मिळवण्यासाठी येथे Click  करा.

 ई-मेल (E-mail) कसा पाठवावा ?


        आपल्याला आलेले ई-मेल (E-mail) ह्या इनबॉक्स (Inbox) मध्ये असतात.
1) ई-मेल (E-mail) पाठविण्यासाठी ई-मेल (Inbox) च्या बाजूला असलेल्या कम्पोज मेल (Compose mail) ह्या पर्यायावर क्लिक करावे. 

2) समोर आलेल्या बॉक्समध्ये टू (To) च्या पुढे ज्या व्यक्तीला मेल (mail) करायचा आहे त्याचा आयडी (ID) टाईप करा.

3) एकापेक्षा अधिक व्यक्तींना ई-मेल (E-mail) पाठवायचा असल्यास, स्वल्पविराम देउन त्यांचे आयडी (ID) टाईप करावे.

4) सीसी (CC) याचा अर्थ कार्बन कॉपी (Carbon Copy). यात आपण जितक्या व्यक्तींना मेल (Mail) पाठवला त्या सर्व व्यक्तींना जेव्हा ई-मेल (E-mail) मिळेल तेव्हा इतर कोणा कोणाला तो मेल पाठवला आहे, त्याची लिस्ट (List) दिसेल.

5) बीसीसी (BCC) म्हणजे ब्लाईड कार्बन कॉपी (Blind Carbon Copy).ह्या ऑप्शन (Option) मध्येही एकापेक्षा जास्त व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे मेल (mail) आपण पाठवू शकतो.परंतु त्या व्यक्तींना, इतर कोणाकोणाला मेल (mail) पाठवला आहे, त्याची लिस्ट (List) किंवा माहिती दिसत नाही.फक्त मेल (mail) पाठवणाऱ्याचे नाव कळते. 

6) सब्जेक्ट (Subject) या पर्यायामध्ये मेल (mail) कशासंबंधी आहे तो विषय थोडक्यात लिहावा.

7) आपल्याला जी माहिती पाठवायची आहे ती सर्व माहिती मोठ्या टेक्स्ट बॉक्स (Text box) मध्ये लिहावी.आपण टाईप केलेल्या माहितीमध्ये स्पेलिंग मिस्टेक (Spelling mistakes) असतील तर चेक स्पेलिंग (Check Spelling) ह्या बटणाच्या साहाय्याने त्या दूर करू शकतो.

8) जर आपल्याला मेल (Mail) सोबत एखादी अटचमेंट (Attachment) द्यायची असेल (एखादी दुसरी फाईल (File) जोडायची असेल) तर अटच अ फाईल (attach a file) वर क्लिक करावे व हवी असलेली फाईल (File) घ्यावी.

9)त्यानंतर सेंड (Send) बटणावर क्लिक करावे.मेल सेंड (Mail send) झाल्यानंतर युवर मसेज सक्से सक्सेसस्फुल्ली सेंड (Your massage successfully send) हा मसेज (massage) दिसेल.

एकाच ठिकाणी सर्व काही

MS-Word MS-Excel इत्यादी प्रकारच्या Files PDF मध्ये Convert करु शकता....

        खाली दिलेल्या सर्व बाबी तुम्ही एकाच पेज वर करू शकता

यासाठी खाली दिलेल्या Link वर Click करा..
 
                   येथे क्लिक करा


EVERY TOOL YOU NEED TO WORK WITH PDFS IN ONE PLACE

Every tool you need to use PDFs, at your fingertips. All are 100% FREE and easy to use! 
Merge, split, compress, convert, rotate, unlock and watermark PDFs with just a few clicks.



Merge PDF

Combine PDFs in the order you want with the easiest PDF merger available.

Split PDF

Separate one page or a whole set for easy conversion into independent PDF files.

Compress PDF

Reduce file size while optimizing for maximal PDF quality.

PDF to WORD

Easily convert your PDF files into easy to edit DOC and DOCX documents. The converted WORD document is almost 100% accurate.

PDF to POWERPOINT

Turn your PDF files into easy to edit PPT and PPTX slideshows.

PDF to EXCEL

Pull data straight from PDFs into EXCEL spreadsheets in a few short seconds.

WORD to PDF

Make DOC and DOCX files easy to read by converting them to PDF.

POWERPOINT to PDF

Make PPT and PPTX slideshows easy to view by converting them to PDF.

EXCEL to PDF

Make EXCEL spreadsheets easy to read by converting them to PDF.

PDF to JPG

Convert each PDF page into a JPG or extract all images contained in a PDF.

JPG to PDF

Convert JPG images to PDF in seconds. Easily adjust orientation and margins.

Page numbers

Add page numbers into PDFs with ease. Choose your positions, dimensions, typography.

Watermark

Stamp an image or text over your PDF in seconds. Choose the typography, transparency and position.

Unlock PDF

Remove PDF password security, giving you the freedom to use your PDFs as you want.

Rotate PDF

Rotate your PDFs the way you need them. You can even rotate multiple PDFs at once!