चौथीपर्यंतच्या वर्गांचे भवितव्य हे पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांच्या प्रतिसादावर
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मत.
मुंबई / प्रतिनिधी : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरु होणार असून या वर्गांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी दिली आहे. त्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांचे भवितव्य आता पाचवी ते आठवीच्या शाळांवर अवलंबून आहे.
राज्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून शाळा बंद होत्या मात्र आता नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. या वर्गांना विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे त्यामुळे राज्य शिक्षण विभागाकडून पाचवी ते आठविचे वर्ग सुरु करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. या वर्गांना मिळणारे प्रतिसाद पाहून पुढील काहीदिवसात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी यावेळी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार यामध्ये दुमत नाही.
No comments:
Post a Comment