K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 22 January 2021

 Benefits Of Walking : सकाळी संध्याकाळी चालायला जाण्याचे हे आहेत अद्भूत फायदे

        अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचण्यासाठी डॉक्टर आपल्या रुग्णांना दररोज चालण्याचा अर्थात Walking करण्याचा सल्ला देतात. तर मंडळी चालण्याने होणा-या फायद्यांमागे दडलेली शास्त्रीय कारणे आज आम्ही आपणास सांगणार आहोत.

        कित्येक तरुण मंडळींसोबत वयस्कर मंडळींनाही सकाळी किंवा संध्याकाळी चालायला घराबाहेर पडलेलं अवश्य पाहिलं असेल. कधी कधी तर रस्त्याला अशी काही वयस्कर मंडळी दिसतात जी तरुणांपेक्षा धडधाकट आणि उत्साही असतात. त्यांना पाहून आपल्याला प्रश्न पडतो की या वयात कुठून येते यांच्याकडे इतकी उर्जा? पण त्या आजी-आजोबांसारखं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. थोडासा बेजबाबदारपणा आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांच्या विळख्यात आणून सोडू शकतो.

        असं म्हणतात की दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला पायी चालायला जाणं बंधनकारक आहे. कारण यामुळे आपल्या आरोग्यास अनेक प्रकारचे फायदे होतात. हल्लीच झालेल्या एका शास्त्रीय अभ्यासामध्ये सिद्ध झालं आहे की पायी चालण्याचे फायदे किती आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती देणार आहोत.

ह्रदय राहते तंदुरुस्त :-

         सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ह्रदय निरोगी ठेवणं सर्वात कठीण गोष्ट झालेली आहे. कारण बदलती जीवनशैली, चूकीची आहारपद्धती, अयोग्य झोपेच्या वेळा या सर्व गोष्टींचा परिणाम ह्रदयावर दिसून येतो. ह्रदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही कार्डियोप्रोटेक्टिव पदार्थांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. याव्यतीरिक्त दररोज काही वेळासाठी पायी चालण्याचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्या ह्रदयास मिळतात. चालल्याने रक्ताभिसरण कार्य म्हणजेच Blood Circulation सुरळीत सुरु राहतं आणि त्याचा चांगला प्रभाव आपल्या ह्रदयावर दिसून येतो. त्यामुळे नियमित चालण्याची सवय स्वत:ला आणि कुटुंबीयांना लावण्याचा प्रयत्न करा.

हाडांच्या मजबूतीसाठी :-

         हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम नावाच्या पोषक घटकाची शरीराला अत्यंत आवश्यकता असते. परंतु पायी चालणं किंवा शतपावली करणं हाडं मजबूत बनवण्यात भरपूर लाभदायक ठरतं. यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतल्यास हे समजणं फारच सोपं होईल. पायी चालण्याने हाडे मजबूत होतात कारण यामुळे जवळजवळ सर्वच हाडांचा एकप्रकारे व्यायाम होतो. तसेच हाडांमध्ये असलेले एका विशिष्ट प्रकारचे द्रव्य हाडे मजबूत करण्यात मोलाची भूमिका पार पाडते.

मूड :-

         सध्या करोना व्हायरसने सर्व जगात धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. पण गेले कित्येक महिने सुरु असलेला हा लॉकडाऊन आपल्या स्ट्रेस किंवा डिप्रेशनचे कारणही बनू शकतो. त्यामुळे स्वत:ला सतत खोलीत डांबून घेता दररोज सकाळ आणि संध्याकाळ १५ ते २० मिनिटे घराच्या बाहेरील आवारात किंवा घरातील मोकळ्या जागेत चाला. मोकळ्या हवेत फेरफटका मारल्याने तुम्हाला ताजी हवा देखील मिळेल आणु मूड फ्रेश होईल. तसेच नकारात्मक विचारांना मुळापासून उपटून टाकण्यासाठी चालणं हा सर्वोत्तम उपाय मानला जातो.

वजन कमी करण्यासाठी :-

         वाढतं वजन टाईप चा मधुमेह (Diabetes) आणि कॅन्सरला निमंत्रण देण्यासारखं असतं. त्यामुळे आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्यापिण्यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. याव्यतीरिक्त दररोज २० ते २५ मिनिटे चुकता चालण्याची सवय शरीराला लावून घ्या. याने फक्त तुमची पोटावरची चरबीच कमी होणार नाही तर वजनावर नियंत्रण मिळवण्यातही खूप मदत होईल. हल्ली ऑफिस, घरातील कामे किंवा इतर अडचणींमुळे -याचजणांना जिम किंवा योग करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

मेंदू :-

         मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी पायी चालणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आपल्याला सकारात्मकदृष्ट्या जगण्याचा दृष्टिकोन देतं. पायी चालल्यामुळे रक्ताभिरसणाचे कार्य अत्यंत सुलभ सुरु राहते आणि यामुळे मेंदूलाही योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होण्यास मदत होते. यामुळे ब्रेन स्टोकचा धोकाही -याच प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळेच मित्रांनो दररोज चुकता सकाळी आणि संध्याकाळी चालण्याचा सवयीचा आपल्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करण्यास विसरु नका. योग्य आहार घ्या, नियमित चाला, स्ट्रेस फ्रि आणि हसत राहा.

 

No comments:

Post a Comment