K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 22 January 2021

 तोंड दातांचे आरोग्य :-

        तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. दातहिरडयातोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल. खराब झालेले दातकिडलेले दातदातावरचे कीटणसुजलेल्या हिरडयाहिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांना देखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात-हिरडयांचे आजार मोठया प्रमाणात होते. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रश. ब्रशमुळे दात साफ राहतातकमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात.

    दाताचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरेच काम करू शकतो.

  1. दातांची निगा कशी ठेवायची ते सर्वांना शिकवणे
  2. किडलेल्या दातात सिमेंट भरणे
  3. कीटण काढणे
  4. खूप हलणारा दात काढणे
  5. वृध्द माणसांना कवळी बसवून घ्यायला प्रवृत्त करणे
  6. दातांचीहिरडयांची तपासणी

 

        ही कामे अगदी महत्त्वाची आहेत. आपल्यालाही ती नक्की करता येतीलफक्त त्यासाठी थोडे प्रशिक्षण पाहिजे. या प्रकरणात या कामांसाठी लागणारी माहिती आपण बघू या.

 

Gums Pain : दात  हिरड्यांचं दुखणं वाढलंयमग ट्राय करा हे घरगुती उपाय!

        दातांच्या दुखण्याची अनेक वेगवेगळी कारणं असू शकतातपण कधी अचानकच दातांचं दुखणं वाढलं आणि घरात कोणतीही औषधं उपलब्ध नसतील तर काही साध्यासोप्या घरगुती उपचारांनी तुम्ही हे दुखणं सहज दूर करु शकता.

        दातदुखी (toothache) किंवा हिरड्यांना सूज येणं (swelling of the gums) या अशा समस्या आहेत ज्या डोळ्यांतून पाणी काढल्याशिवाय राहात नाहीतदातदुखी सुरु झाली की त्यासोबत जोडल्या गेलेल्या डोक्याच्यागळ्याच्याडोळ्यांच्या सर्वच नसा दुखू लागतात आणि हे दुखणं इतकं तीव्र असतं की आपण धड पाणी देखील सुखाने पिऊ शकत नाहीदाढ सतत ठणकत असल्याने किंवा झिणझिण्या येत असल्याने चिडचिड होतेअसहाय्य वाटतंसहन होत नसल्याने रडू येतंबरं हे सर्व तर आहेच पण ही दातदुखी नेमकी रात्रीच्या जेवणानंतरच होतेकारण खाताना दातांच्या फटीत अन्नाचे छोटे छोटे कण अडकून राहतात आणि काही वेळानंतर त्यावरील कीड त्रास देऊ लागते.

        कधी कधी दातांच्या दुखण्यासोबत कानदुखी (earache) देखील सुरु होते आणि अक्षरशमाणूस तळमळू लागतोकधी कधी तर हिरड्यांनाच सूज आल्याने गालगालावरील नसा ताणल्या जाऊन वेदना सुरु होतातत्यातच करोनाने (coronavirus) जगभरात शिरकाव केल्यापासून गेले कित्येक महिने लॉकडाऊन (lockdown) सुरु आहेअशा परिस्थितीत दातांच्या डॉक्टरकडे (dentist) जाणं देखील भीतीदायक वाटू लागलं आहेअशावेळी अचानक दातदुखी सुरु झाली तरघाबरुन जाऊ नकाआम्ही तुम्हाला आज असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत ज्याचा कोणाताही वाईट परिणाम शरीरावर होणार नाही आणि दातदुखी किंवा हिरड्यांच्या सूजेवर ते एक रामबाण घरगुती उपाय ठरतील.

लिंबूची लाप्सी :-

पाव चमचा हिंग घ्या.

एक लिंबू घेऊन त्याचा रस एका वाटीत पिळून घ्या.

या रसात हिंग टाकून मिश्रण चांगलं मिक्स करुन घ्या.

आता या मिश्रणात कापसाचे बोळे भिजत घाला.

नंतर हे भिजलेले कापसाचे गोळे जो दात दुखतोय त्याच्या आतून आणि बाहेरुन गुंडाळून घ्या किंवा चिपकवून ठेवा.

या दरम्यान तोंडात जमा होणारी लाळ थुंकत राहा.

या प्रक्रियेनंतर काही वेळातच तुम्हाला दातदुखीपासून मुक्ती मिळेल.

हिंग :-

हिंग केवळ पोटदुखी किंवा पोट साफ करण्यासाठीच लाभदायक नसून ते दातदुखी किंवा दातांशी निगडीत सर्व समस्या दूर करण्यास प्रभावी ठरतेजर तुमचा वेळी-अवेळी अचानकच दात दुखू लागला तर हिंगाचा एक तुकडा घेऊन तो दुखणा-या दाताच्या वर ठेवाहिंगाचा तुकडा तुमच्या तोडांची चव खराब करुन टाकेल पण यामुळे दातांच्या वेदना काही वेळातच दूर होतीलतुम्ही हा हिंगाचा तुकडा कापसात गुंडाळून देखील दातावर ठेवू शकतायामुळे हिंगाचा तिखटपणा कमी होईल.

हिंगाच्या गुळण्या करा :-

एक कप पाण्यात  ते  चिमुटभर हिंग टाका आणि इतक्याच प्रमाणात सैंधव मीठ टाकून ते पाणी उकळून घ्याजेव्हा हे पाणी थोडे कोमट होईल तेव्ही त्या पाण्याने गुळण्या करागुळण्या करताना ते पाणी काही वेळ तोंडात धरुन ठेवाजेणे करुन या दोन्ही औषधी पदार्थांचा परिणाम दात आणि हिरड्यांवर होईलगरम पाण्यामुळे सूज दूर होईल आणि हिंग  सैंधव मीठाने दातदुखीपासून आराम मिळेल.

 लवंग :-

दातदुखी सौम्य असेल किंवा झिणझिण्या येत असतील तर दाताखाली लवंग धरायादरम्यान कोमट पाणीच प्यादातदुखीमध्ये आंबट आणि थंड पदार्थ खाणं टाळालवंगामध्ये ॲटीबॅक्टेरियलॲटीएन्फ्लामेट्री गुणधर्म असतातहे गुणधर्म दातांतील किडीला मारुन टाकतातसोबतच सूज आणि दुखणं कमी करतातघरात लवंगाचे तेल असेल तर अजूनच उत्तमदुखणा-या दातावर लवंगाच्या तेलात बुडवलेला कापूस ठेवा आणि लगेचच आराम मिळवा.

कांदा  लसूण :-

 कांदा सदैव आपल्या घरात उपलब्ध असतोअचानक दातदुखी वाढली तर कांद्याचा एक तुकडा कापून दातावर ठेवाजर तुम्हाला कच्चा कांदा दातावर ठेवण्यास काही अडचण येत असेल तर कांदा किसून घ्याकांदा किसल्यावर त्यातून जो रस निघेल त्यात कापसाचा बोळा भिजत घाला आणि तो बोळा दातावर ठेवातसेच लसणाच्या दोन पाकळ्या सोलून घ्यादुखत असलेल्या दातावर ठेवून ते लसूण चावात्याचा रस दाताचं दुखणं कमी करेल.


ओठांची काळजी :-

 वातावरणातील बदलवाढते वय आणि ’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतातओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होतेयापासून सुटका होण्यासाठी फळेभाज्यामासेअंडीसुकामेवादूध यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश करावातसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक आहे.


 ओठ कोरडे झाल्यास त्यावर ताजे लोणी लावावेत्यामुळे ओठांना ओलावा मिळून ओठ मुलायम होतात.


 ओठ दाताने कुरतडण्याच्या सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचतेओठांचे पापुद्रे निघतातभेगा पडतातत्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येतेओठ राठ दिसतातयासाठी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर करता येईलहे पारदर्शी रंगांचेही असते.


 सकाळीरात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावात्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईललोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.


 कोरडय़ा पडणाऱ्या ओठांसाठी रात्री झोपताना व्हॅसलिन  लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावावा.


 ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधात केसर घालून ते ओठांवर चोळा यामुळे ओठांचा काळेपणा जाऊन ओठ चमकदार दिसतील.


 शेंगदाण्याच्या तेलाने ओठावर मसाज करून नंतर सुती कपडय़ाने पुसून घ्याओठ नरम होतील.


 लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्हॅसलिन लावून त्यावर लिपस्टिक लावल्यास ती जास्त वेळ राहते.


 लावलेली लिपस्टिक ओठांवर जास्त वेळ राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावावी.


 लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर लावून बेस तयार करून नंतर त्यावर लिपस्टिक लावल्यासही लिपस्टिक बराच वेळ टिकून राहते.


 रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे.


 गडद रंगाची लिपस्टिक लावली की ती दातांना लागते आणि बोलताना-हसताना ते वाईट दिसते.


 गडद लिपस्टिक लावल्यावर पेपर नॅपकिन किंवा रुमाल ओठांच्या मध्ये ठेवून ओठांनी दाब द्यावा त्यामुळे जास्तीची लिपस्टिक टिपली जाऊन आजूबाजूला पसरत नाही.
संकलित

दातांची निगा कशी राखणार?

प्रस्तावना

सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ घासावेतत्यासाठी मऊ पावडर किंवा बारीक मीठ वापरावे किंवा कडूनिंबाच्या काड्यांनी दात घासावेतलहान मुलांसाठी मऊ  लहान ब्रशचा वापर करावात्यामुळे दात स्वच्छ रहावयास मदत होतेतसेच आपला श्वास ताजातवाना वाटतोतोंडाला वास येत नाहीआपण दिवसभर जे खातो त्याचे अन्नकण दाताच्या फटीत अडकून राहतातत्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेतमिश्रीने दात घासू नयेतदात शक्यतो ब्रशनेच घासावेत  घासण्यासाठी बाजारात मिळणारे दंतमंजन किंवा टूथपेस्ट वापरावीकोळसा किंवा राखेने दात घासल्यास दातांची झीज जास्त होतेजेवणापूर्वी नेहमी चूळ भरावीजेवणानंतर तसेच प्रत्येक वेळी काही खाल्ले किंवा चहा सारखी पेये प्यायल्यावरही चुळा भरून दातांवरून बोटे फिरवून दात स्वच्छ करावेततसेच हिरड्यांवरूनही बोटे फिरवावे म्हणजे हिरड्या मजबूत होऊन दात दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

दातांचे आरोग्य म्हणजे काय ? :-

        आपले तोंड हे वरून सुंदर दिसले तरी दाताची निगा  स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहेआपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहेदातजीभओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहेचेहरा हा माणसाचा आरसा आहेभावनांचा गोंधळ चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोमौखिक आरोग्य चांगले नसल्यास दाताचेहिरड्यांचे विकार उद्भवतातदात स्वच्छ  ठेवल्यास त्या ठिकाणी आम्ल तयार होते  दात किडतातया कारणामुळे ९५ टक्के लोकांचे दात किडलेले असतातकाहीवेळा त्यामुळे दाटला छिद्रे पडतातही छिद्रे भरली नाहीत तर दात लवकर पडतो आणि तो दुखायला लागतोतेथील रक्तवाहिन्या तुटताततेथून रक्त  पू येतोअशावेळी हिरड्यांचा आधार असलेले हाड घासले जाते.

        एखादा पदार्थ खाल्यास प्रत्येकवेळी तोंड धुणे आवश्यक आहे का ?

माणसे विविध पदार्थ खातातपरंतु तोंड धुवत नाहीतअन्नकण तेथेच अडकून रहातातमुले काही खाल्ल्यावर तोंड धुवत नाहीत ही वाईट सवय आहेत्यामुळे हिरड्यांचे विकार उद्भवतातब्रश योग्य पद्धतीने केला पाहिजेहिरड्यांवर बोटाने हात फिरविला पाहिजेत्यामुळे तेथील वाहिन्या कार्यक्षम होतातदाताच्या फटीत अन्नकण अडकून आम्ल तयार होतेदातावरील आवरण दातांचे संरक्षण करीत असतेया आम्लांमुळे त्या आवरणावर वाईट परिणाम होतातम्हणून प्रत्येक वेळी तोंड धुणे आवश्यक आहे.

ब्रशने दात स्वच्छ करताना ते कसे करावेत ?

ब्रशने आपण दात स्वच्छ करतोपरंतु ब्रश विविध वयाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळे  योग्य असावेतलहान मुलांसाठी त्यांचे तोंड लहान असल्याने विशेष करून लहान मुलांकरिता तयार करण्यात आलेले ब्रश उपयोगी पडतातमोठया व्यक्तींनी दात स्वच्छ करताना आपण ज्याप्रमाणे झाडू फिरवितो त्याप्रमाणे ब्रश आतून बाहेर फिरवावा जेणेकरून अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतीलब्रश वर-खाली या पद्धतीने फिरविल्यास दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण निघून जातातकाही वेळा ब्रश खराब होतो आणि आपण तो वापरतच रहातोखराब ब्रशमुळे हिरड्या दुखावल्या जातात.त्यामुळे ब्रश खराब झाल्यावर ताबडतोब फेकून दयावा.

तोंडाची दुर्गंधी कशामुळे येते ?

एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गंधीमुळे घाणेरडा वास येतोहा वास टारटरमुळे येत असतोदात स्वच्छ  केल्यामुळे दातावर टारटर जमतोहा थर काढल्यास दात स्वच्छ होतातवेळीच उपचार  केल्यास रक्त  पू येतोकाही वेळा रक्तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावाऔषधोपचार घ्यावेत.

पालकांनी मुलांच्या  स्वतःच्या दातांची कशी काळजी घ्यावी ?

    लहानपणापासून पालकांनी मुलांच्या दातांची काळजी घ्यावीपालकांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.आई वडिलांनी ही सवय स्वतःला लावून घ्यावी  मुलांनाही लावावीकाही वेळा दुधाच्या दाताच्या बाजूने दुसरा दात येण्यास सुरुवात होतेकारण दुधाचे दात वेळेवर  पडल्यास अथवा हिरडी जड असल्यामुळे कायमचा दात ठराविक वयात वर येण्याचा प्रयत्न करतोत्यामुळे आपण असे म्हणतो की दात ठराविक वयात वर येण्याचा प्रयत्न करतोत्यामुळे आपण असे म्हणतो की डबल दात आलेदुधाचे दात काढून टाकल्यास मग कायमचे दात तिथे सरकतातलहान मुलांना दूध पिण्यासाठी प्रवृत्त करावेदुधामध्ये कॅल्शियम असतेबाजरीनाचणीशेवगासीताफळरामफळ यात कॅल्शियम असते.

तंबाखूमुळे दाताचा कर्करोग होते का ?

    तंबाखूमुळे दाताचा कर्करोग होतोतंबाखूत रासायनिक पदार्थ आहेतत्यातील निकोटीन शरीरास अपायकारक आहेलोक जीभ आणि गालाच्या पोकळीत तंबाखू चुनाकातसुपारी ठेवताततोंडात निकोटीनचे चट्टे उमटतातही सवय बंद केली पाहिजेआदिवासी भागातील लोकांना आपण तोंडात जळती विडी ठेवताना पहातोहा जळता भाग तोंडाच्या आतील बाजूस असतोतंबाखू जळून रासायनिक पदार्थ तयार होतोहे कर्करोगाला आमंत्रण आहेलोक पंधरा ते वीस मिनिटे दाताला तंबाखू चोळत असतातत्यामुळे दातावरील आवरण निघून जातेतोंडातील व्रण केवळ दुखतातच असे नाही तर ते लवकर बरे देखील होत नाहीतअशावेळी कर्करोगाची तपासणी वेळीच करून घ्यावी.

हे करू नका

    दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नयेदुखापत होते.

    दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.

    दात कोरु नयेतअसे केल्याने दातांना  हिरड्यांना इजा पोहोचते.

    दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.

 

No comments:

Post a Comment