काही शैक्षणिक व कृषी विभागाचे उपयोगी ॲप्लिकेशन्स
ॲप डाऊनलोड करण्यासाठी ॲपच्या नावावर CLICK करा.
उपयोग/वैशिष्ट्ये :-
■विविध प्रश्नांचा भरपूर सराव.
■गृहपाठ, अभ्यासासाठी धडे, भाषिक खेळ यांचा समावेश.
■ऑडिओ क्लिप द्वारे इंग्रजी उच्चारणाची तपासणी.
■इंग्रजी शब्दकोशाचा समावेश.
■ अभ्यासासाठी भरपूर सराव चाचण्यांचा समावेश.
उपयोग/वैशिष्ट्ये
■ कोणत्याही ईमेज ला स्कॅन करून तीचे PDF अथवा JPG मध्ये रूपांतर करता येते.
■स्कॅन केलेल्या ईमेज वर आपले नाव टाकण्याची सोय.
■त्याचबरोबर स्कॅन ईमेज PDF अथवा JPG मध्ये शेअर करता येते.
■ सदरील ॲप काँप्युटरला जोडलेल्या स्कॅनर सारखे काम करते.
उपयोग/वैशिष्ट्ये
■ PDF फाईल वाचण्यासाठी या ॲपचा उपयोग होतो.
■तसेच PDF मध्ये TEXT काॅपी करून कोठेही PASTE करता येतो.
उपयोग/वैशिष्ट्ये
■महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागाचे शासन निर्णय पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी उपयोग.
■शासनाचे सर्व शासन निर्णय (G.R.) आपणास मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषातुन मिळु शकतात.
उपयोग/वैशिष्ट्ये
■शिक्षकांसाठी अत्यंत उपयोगी.
■वर्ग निहाय आकारिक व संकलित प्रश्नपत्रिका, वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाची सोय, दैनंदिन नोंदी, शैक्षणिक G.R, वर्ग निहाय उपक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध.
■सरल नोंदतक्ते, महापुरुषांच्या जयंती / पुण्यतिथी विषयी माहिती उपलब्ध.
■विविध स्पर्धा परीक्षा बाबत माहिती.
उपयोग/वैशिष्ट्ये
■खास करुन शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी.
■वर्ग 1 ते 8 साठी विषय निहाय शालेय अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ सराव चाचण्या उपलब्ध.
■चाचण्यांचा सराव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते.
■परीक्षेविषयी विद्यार्थ्यांची भिती कमी होण्यास मदत होते.
उपयोग/वैशिष्ट्ये
■या ॲपव्दारे कोणत्याही ईमेज चे PDF मध्ये रुपांतर करता येते.
■ यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते.
उपयोग /वैशिष्ट्ये
■नामांकित मराठी वृत्तपत्रांच्या बातम्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.
■वेगवेगळ्या पेपर्सच्या साईट्स ओपन करण्याची गरज भासत नाही.
उपयोग/वैशिष्ट्ये
■महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र समजले जाणारे "लोकराज्य " मासिक या ॲप द्वारे वाचता येते.
■त्याचबरोबर लोकराज्यचे जुने अंक सुद्धा आपणास वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.
● कृषी विभागाचे (महाराष्ट्र शासन) शेती संबंधित मोबाईल ॲप●
शेती संबंधित मोबाईल ॲपचा वापर करणेबाबत.....
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे. कृषि विभागामार्फत शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, शेतक-यांनी शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करावा. सद्यस्थितीत विकसित अशा मोबाईल ॲपची माहिती खालीलप्रमाणे.
अ.क्र | मोबाईल ॲपचे नाव | ॲपद्वारे उपलब्ध होणारी माहिती | मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ |
---|---|---|---|
1 | शेतकरी मासिक (Shetkari Masik) | शेतकरी मासिकातील लेख | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
2 | (Maharain) | मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस | महारेन |
3 | क्रॉप क्लिनिक (Crop clinic) | सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादी | mahaagriiqc.gov.in |
4 | कृषि मित्र (Krishi mitra) | तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहिती | mahaagriiqc.gov.in |
5 | एम किसान भारत (mKisan India) | कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले | फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
6 | किसान सुविधा (Kisan Suvidha) | हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
7 | पुसा कृषि (Pusa Krishi) | पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
8 | क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance) | पिक विमा माहिती | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
9 | डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India) | तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दर | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
10 | ॲग्री मार्केट (AgriMarket) | ५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
11 | पशु पोषण (Pashu Poshan) | जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन | गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
12 | cotton (Kapus) | कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती | गुगल प्ले स्टोअर |
13 | एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) | मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती | गुगल प्ले स्टोअर |
14 | हळद लागवड, (halad Lagwad) | हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती | गुगल प्ले स्टोअर |
15 | पिक पोषण (Plant nutrition) | पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहिती | गुगल प्ले स्टोअर |
16 | लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton) | मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती | गुगल प्ले स्टोअर |
17 | शेकरु (Shekaru) | कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहिती | गुगल प्ले स्टोअर |
18 | इफ्को किसान (IFFCO Kisan) | हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओज | गुगल प्ले स्टोअर |
No comments:
Post a Comment