चहा किंवा कॉफीपूर्वी घेण्यापूर्वी पाणी प्यावे :-
जर तुम्ही चहाप्रेमी असाल किंवा कॉफी घेतल्याशिवाय तुमचा दिवस जात नसेल तर हे नक्की वाचा.
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ॲसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे ॲसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे ॲसिडिक रेंज थोडीसी कमी आहे.
म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा ॲसिडिटी वाढते. तसंच अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची काहीशी शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील ॲसिडची पातळी काहीशी सौम्य होते आणि पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ॲसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.
जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के वयस्क लोक रोज चहा अथवा कॉफी पितात. ही पेये शरीराला तत्काळ ऊर्जा व तरतरी देण्याचे काम करतात. यामुळेच बहुतांश लोक सकाळच्या नाष्ट्यापूर्वी किंवा नंतर चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात.
काही लोक कंटाळा अथवा आळस घालवण्यासाठीही या दोन पेयांचा सर्रास वापर करतात. मात्र, अनेक संशोधनांत कॉफी पिणे हे शरीरासाठी नुकसानकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर काहींत ही दोन्ही पेये शरीरासाठी लाभकारक असल्याचा दावा करण्यात आला.
यासंबंधी आता एक नवे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक ठरते. कारण चहाच्या तुलनेत कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॉफी शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच आळस घालवण्याचे काम करत असली तरी प्रमाणापेक्षा जास्त कॅफिनमुळे घाबरणे अथवा हृदयासंबंधीची समस्याही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment