K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 26 January 2021

 संगणकाची स्क्रीन पासवर्ड ने लॉक करणे :-

आपण आपल्या संगणकामध्ये आपली खूप माहिती जतन करू ठेवतो पण हाच संगणक दुसऱ्याने आपल्या नजर चुकीने हाताळला तर आपली माहिती दुसरा व्यक्ती चोरून घेऊ शकतो , त्यासाठी आपल्या संगणकाची स्क्रीन जर पासवर्ड ने लॉक असली तर कोणीही आपल्याला माहिती असलेला पासवर्ड  स्क्रीन वर  टाकला नाहीतर संगणक ओपन शकत नाही.


संगणकाला पासवर्ड ने लॉक करण्यासाठी खालील कृती करा.


 सर्वप्रथम आपल्या संगणकाच्या control panel मध्ये जा.


 यात Control accounts and family safety हा पर्याय असेल त्यातील Add or remove user accounts  वर क्लिक करा.


 येथे आपला user account असेल त्याच्यावर क्लिक करा नसेल तर Create new account हा पर्याय असेल तेथे नवीन user account तयार करून त्याच्यावर क्लिक करा.


येथे नवीन स्क्रीन ओपन होईल त्यात create a password असा दुसरा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.


आता परत नवीन स्क्रीन येईल तेथे new password मध्ये आपल्याला हवा तो पासवर्ड तयार करून टाका व खाली confirm पासवर्ड वर तोच पासवर्ड टाका.


 आता खाली create password वर क्लिक करा.


अशा प्रकारे आपल्या संगणकाची स्क्रीन password ने लॉक झाली असेल.


जेव्हा जेव्हा आपण संगणक नव्याने सुरु करू तेव्हा स्क्रीन सुरु होण्यासाठी पासवर्ड मागेल , दुसऱ्याला पासवर्ड माहिती नसेल तर तो संगणक सुरु करू शकत नाही.


हा जो पासवर्ड टाकाल तो व्यवस्थित आठवेल असा ठेवा कारण पासवर्ड विसरल्यास  परत संगणक सुरु करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागते.


Add or remove accounts  वर गेल्यावर आपण पासवर्ड बदलू शकतो , पासवर्ड remove सुद्धा करू शकतो.

No comments:

Post a Comment