जाणून घ्या पाणी कधी आणि कसे प्यावे :-
पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची योग्य पद्धतीने साफ व्हावे यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात प्रत्येकाने किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र कामाच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या नादात आपण पाणी पिणे पूर्णपणे विसरुन जातो. आता जास्ती पाणी प्यावे हे ठिक आहे. पण दिवसातील कोणत्या वेळात पाणी प्यावे. ते कशा पद्धतीने प्यावे, जेवणादरम्यान पाणी पिण्याचे कोणते नियम पाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल यांबाबत माहिती घेऊया. मात्र हे पाणी कसे आणि दिवसातील कोणत्या वेळेस प्यायलेले चांगले हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पाहूयात दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा काही सोप्या टीप्स -
१. दुपारी आणि रात्री जेवणाच्या १ ते पाऊण तास आधी आवश्यक तितके पाणी प्या. जेवणाची वेळ निश्चित असल्यास हे करणे जास्त सोपे होते.
२. जेवताना मधे सारखे पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र ते आरोग्यासाठी चांगले नसते. फारतर पोळी आणि भात खाण्याच्या मधे दोन घोट पाणी आणि जेवणानंतर दोन घोट पाणी पिणे ठिक आहे. पण त्याहून जास्त पाणी जेवताना पिऊ नये.
३. जेवणानंतर एक ते दिड तासाने पाणी प्यावे. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. जेवताना आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने आपल्या पोटात पेटलेला अग्नी विझतो आणि पचनक्रियेमध्ये अडचणी येतात.
४. सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्यावे. हे पाणी घटाघट न पिता एक एक घोट प्यावे. तोंडात रात्री जमा झालेली लाळ अतिशय औषधी असते.
५. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यावं, यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होईल. व्यायाम करुन झाल्यानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावे.
६. झोपण्याच्या आधी एर्धा ते एक तास पाणी प्यावे. एकदम झोपण्याआधी पाणी पिऊ नये. कारण पाणी पिऊन लगेच आडवे झाल्यास ते योग्य पद्धतीने शरीरात पसरण्यामध्ये अडचणी येतात.
७. आंघोळीनंतर न चुकता १ ग्लास पाणी प्यावे. आंघोळीमुळे शरीर काही प्रमाणात थकते. अशावेळी पाणी प्यायल्याने तरतरी येते. तसेच यामुळे रक्तदाबाचा त्रास उद्भवत नाही.
८. पाणी उभे राहून पिऊ नये. बसून पाणी प्यायल्याने शरीरात त्याचे जास्त चांगल्या पद्धतीने आवश्यक त्याठिकाणी वहन होते. उभ्याने पाणी प्यायल्याने नसांवर ताण येतो.
पाणी कसे प्यावे :-
वेळेनुसार पाण्याचा वापर :-
पाणी पिण्यासाठी वेळ कोणती असावी हे आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
1)सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे.
यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
2)पाणी व जेवण
आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे.जेवण केलेल्यानंतर आपल्या जठरामध्ये मंदग्नी तयात झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते.जेवण झाल्या झाल्या आपन पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अडचण निर्माण होते.व अन्न पचण्याऐवजी सडते त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात.त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी पिले पाहिजे.तसेच पाणी जेवण अगोदर ही पिणे योग्य नाही जेवनाअगोदर अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.
3)रात्री झोपताना देखील पाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे,रात्री झोपताना पाण्या ऐवजी दूध उत्तम असते.म्हणून रात्री पाणी कमि प्रमानात प्यावे.
आता आपण पाहुयात पिण्यायोग्य पाणी म्हणजे नेमके काय व कसे पाणी पिल्याने आपल्या शरीराला फायदा होतो.
1)पाणी नेहमी उकळून प्यावे.हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे.पावसाळ्यात ऋतू बदल झाल्यामुळे सर्दी,ताप,कावीळ यांच्या साथ पसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.
२)थंड पाणी हे शरीराला हानीकारक असते.
3)थोडेसे गरम केलेले पाणी शरीराला केव्हाही चांगले.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.व पोट साफ राहते.
4)सकाळी पाणी पीत असताना त्यामध्ये लिंबू टाकून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
5)पाणी पिण्यास गडबड अजिबात करू नये पाणी एकदम हळू हळू प्यावे.
6)हळू हळू व घोट घोट पाणी पिल्याने डायबीटीज(शुगर) होण्यापासून माणूस वाचू शकतो.
म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पचनसंस्था सुधारते व त्यामुळे आपले आयुष्य वाढते.
या पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर शरीराला फायदे आहेत हे आपण वाचले.आता पुढच्या blog मध्ये आपण पावसाळ्यातील उपाय योजना पाहणार आहोत.धन्यवाद
पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ..
नियम 1.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये
कारण :-
तुम्ही जठराग्नि एकले आहे का कधी , तो जेवल्या नंतर प्रज्वलित होतो आपल्या पोटा मधे अन्न पाचन करण्यासाठी आणि त्यावर तुम्ही पानी ओतुन राहिले , आणि अग्नि वर पानी टाकले तर काय होते … आणि पाचन क्रिया जवळ जवळ थांबते आणि 100 पेक्षा जास्त रोग ला निमंत्रण आपन देऊन जातो , मी दुसऱ्या सारखे संस्कृत मधून पन लाइन देऊ शकतो पण माला माहिती आहे किती लोक त्या लाइन वाचतात , त्या मुळे सिंपल लाइन्स फक्त
जेवन झाल्यानंतर 1 तासने आपण पाणी पिऊ शकतो आणि जेवना अगोदर 40 min आधी तुम्ही पाणी पिऊ शकता
नियम 2
जेव्हा पण पानी पिताल तेव्हा एक एक घोट पाणी प्या
कारण
आपल्या लाळ मधे क्षार असतात आणि पोटा मधे आम्ल , घोट घोट पानी पिले तर क्षार पाण्या सोबत पोटात जाऊन आम्ल न्यूट्रल करतात , एसिडिटी , शुगर , ओवर वेट सगळे प्रॉब्लम पानी घटा घट पानी पिल्यामुळे जन्म घेतात
नियम 3 सकाळी उटल्यानंतर पाणी पीणे
कारण
आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजे अथरुनातुन उठल्या उठल्या पानी पीने , तोड़ धुनया आधी , जी लाळ रात्रभर आपल्या तोंडात बनते ती खुप महत्वाची असते आपली न्यू जनरेशन विचार करू शकत नाही तितके फायदे आहेत , प्रत्येक गोष्टीला गोळी खायची सवय आपल्याला लागली आहे , पोटात रात्रभर आपल्या एसिड बनते आणि सकाळची ही लाळ पोटात गेल्यावर त्या एसिड ला न्यूट्रल करण्याचे काम करते
नियम 4
थंड पाणी पिऊ नये
कारण
आपल्या बॉडी चे कायम एक टेम्परेचर असते , जसे वर सांगितले की पोटा मधे आपल्या अग्नि असतो , आपन फ्रिज मधली गार पानी पिले तर पोट त्या पणयाला गरम करायला सुरुवात करते , 5 min च्या वर तुमच्या पोटात एकदम ठंड पानी राहिले , तर लिवर , किडनी , हार्ट 100 % एक तरी आपला काम करने बंद करते , हे scientifically सिद्ध आहे , 5min च्या आत मधे पोटाला ते पानि टेम्परेचर बॉडी टेम्परेचर ला आनावेच लागते , ते कोठुन गरम होते , पूर्ण बॉडी तिल रक्त ते काम करते , जे लोक छाप मधे तुम्हला सांगतात ना माला तर फ्रिज च्या पाण्या शिवाय होत नाही , मग ठंडी असू वा गर्मी , तुम्ही त्याला आता छाप मधे सांगा की , तू पुढे किती मोठ्या ख़र्चला खड्यात जाणार आहे ते माला माहिती आहे , एवढे एकूणच तो फ्रिज मधील पानी बंद करेल,
फ्रिज चा शोध हा औषधे स्टोर करण्या साठी केला आहे
नियम 5
पानी नेहमी खाली बसून प्यावे
जुने लोक कायम खाली बसून पानी पितात जर कोणी खेडयागावात पाहिले असेल तर तिथले जुने व्यस्कर लोक बसून पानी पितात , जेवढे अस्थि रोग आहेत , गुडघे दुखी , कमर दुखी , सांधे दुखी यांची सुरुवात मुळ उभा राहून पानी पिल्यामुळे होते , गरजे पेक्षा जास्त पानी पिऊ नाका , आज काल चे शहाणे सांगतात , हीरो आणि त्यांनाच फॉलो करणारे मूर्ख , की पानी जास्त प्या , पानी जास्त प्या, मी 3 lit , 5 lit पानी पितो (आमिर खान ' अक्षय ) प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे , पानी पचवायला पन लिवर ला तेवढच कम करावे लागते जितके की अन्न , एक ग्लास ची तहान आहे मग एकच ग्लास पानी प्या , जास्त पानी पिल्याने पण रोग होतात.
No comments:
Post a Comment