K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे :-



        आपण संगणकामध्ये विविध महत्त्वाची माहिती एखाद्या फोल्डरमध्ये जतन करून ठेवतो , पण काही वेळा ही माहिती दुसऱ्याने आपला संगणक ओपन केला तर ती महत्वपूर्ण माहिती ती व्यक्ती पाहू शकते , जर आपला फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर दुसरी व्यक्ती ती माहिती पाहू शकत नाही.


संगणकातील फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करण्यासाठी खूप पद्धती आहेत , मी एक सोपी पद्धत सांगणार आहे. 


त्यासाठी आपल्या संगणकात एक software पाहिजे त्याचे नाव winrar आहे जे zip file साठी असते.


आपल्या PC मध्ये windows ३२ Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून १.८८ mb चा software डाऊनलोड करून घ्या.


http://filehippo.com/download_winrar/download/f148368a8b69f39e14841b8fdabd6a36/


आपल्या PC मध्ये windows ६४  Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून २.०८  mb चा software डाऊनलोड करून घ्या.


http://filehippo.com/download_winrar/download/226bd8cb49453bc241176dc8be4ecaf0/


हा software आपण filehippo.com वरून फ्री मध्ये डाऊनलोड करू शकतो व डाउन लोड झाल्यावर रन करून इंस्टाल करून घ्या.


आता कोणत्याही drive मध्ये किंवा desktop एक फोल्डर तयार करा , त्या मध्ये आपल्या महत्वपूर्ण file पेस्ट करा किंवा जुना फोल्डर असेल असेल तर त्याच्यावर right क्लिक करा.


आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल त्याच्या मध्ये Add to archive…. असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.


आता परत एक पॉप ऑप विंडो ओपन त्यातील पहिला आडवा पर्याय General वर क्लिक करा त्यातील उजव्या बाजूला खाली set password असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.


आता enter password साठी नवीन विंडो ओपन होईल त्यात दोन वेळा पासवर्ड टाका व डाव्या बाजूस खाली ok वर क्लिक करा.


परत एकदा आलेल्या पॉप ऑप विंडो मध्ये खाली ok वर क्लिक करा.


आता आपल्या फोल्डर ची zip file तयार होण्यासाठी प्रक्रिया साधारण १ ते दीड मिनिटात पूर्ण होईल.


आपण ज्या ठिकाणी फोल्डर तयार केला होता तेथे त्या फोल्डर दोन फोल्डर होतात आपण जुना फोल्डर डिलीट करायचा आहे आणि जो winrar चा zip फाईल मध्ये फोल्डर तयार झाला असेल तो तसाच ठेवा.


आपण जेव्हा ही zip file ओपन करू तेव्हा आपला जुना फोल्डर दिसेल.


आपल्याला त्यातील कोणतीही file ओपन करायची असेल तेव्हा आपण सेट केलेला पासवर्ड मागेल जेव्हा ok वर क्लिक करू तेव्हाच ती file ओपन होईल.


दुसऱ्या व्यक्तीला पासवर्ड माहिती नसल्यास तो त्या फोल्डर मधील कोणतीही file ओपन करू शकत नाही.


अशा प्रकारे आपण खूप सोप्या पद्धतीने संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकतो.

No comments:

Post a Comment