K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 31 January 2021

आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय

1) आहार

2) स्वच्छता

3) करमणूक

4) व्यायाम व विश्रांती

5) नोकरी

6) पर्यावरण

आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे

आहार

     दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

स्वच्छता

     व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी सारखे रोग उदभवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

करमणूक

     मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. व्यक्ती जेव्हा उदासिन बनतो, तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सुयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ लाभते.

व्यायाम व विश्रांती

     व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येतो. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ आरोग्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.                        व्यायामाबारोबच विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रिया अंतरिक सहसंबंध आहे. व्यक्तीचे शरीर म्हणजे यंत्र नव्हे. विशिष्ट काळापर्यंत व्यक्ती एखादेच काम करू शकते. पुन्हा तिला थकवा येतो. तेव्हा विश्रांती गरजेची असते. योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारची विश्रांती घेतल्यास विश्रांती नंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

नोकरी

     साधारणपणे व्यक्ती दोन प्रकारचे कार्य करते. बैठया स्वरुपाची आणि बौद्धीक स्वरुपाची काही कामे फारशी शारीरिक ताण न पडता व्यक्तीला करावी लागतात. काही कामे व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करून आपली शक्ती उर्जा खर्च करून करावी लागतात. उदा. शेतमजूर, हमाल, कारखान्यातील कामगार इत्यादी व्यक्ती शारीरिक कष्टाची कामे करतात. कामाच्या स्वरूपावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

     नोकरी करत असतांना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक स्थिती व कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते.

पर्यावरण

     सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होतो. व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती समतोलाची राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो

     अशाप्रकारे व्यक्तीचे आरोग्य जपण्यासाठी किंवा व्यक्तीच्या आरोग्यासाठी वरील घटक महत्त्वपूर्ण असतात. जर व्यक्तीस आरोग्याने साथ दिली तर त्या व्यक्तीस ते काम करण्यास सांगेल ते काम करता येणार नाही. शरीर व मन निरोगी असणे ही व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते.                     

      कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपले जीवन जगात. तिच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे व त्यास रोगाने जर जर केले तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जातेएखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर संपूर्ण समाज सुद्धा निरोगी असावा लागतो. पण सर्व समाजामधील माणसे हे या ना त्या रोगाने आजारी पडलेले असतात. त्यामुळेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर यांचा परिणाम पडतो.

     ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देश हा प्रगतीचा शेवटच्या बिंदूवर जावून पोहोचतो म्हणून या सर्व बाबींसाठी आरोग्य महत्त्वाचे असते. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा, आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे . म्हणतात ना “आपले आरोग्य आपल्या हाती” काळजी घ्या स्वत:ची.


स्त्रोत : आरोग्य म्हणजे काय ? माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

No comments:

Post a Comment