K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

स्मार्टफोन ला बनवा वायरलेस की-बोर्ड व माऊस :-


        सध्या वायरलेस की बोर्ड व माऊस ने संगणकावर काम करणे खूपच आरामदायक झाले आहे ,परंतु अजूनही आपण जर  हे खरेदी केले नसेल तर हरकत नाही .आता आपल्या स्मार्टफोन ला वायरलेस की बोर्ड व माऊस मधे बदलता येते ,तेही अगदी सहजपणे.

        यासाठी आपल्या कॉम्प्यूटर /लॅपटॉप ला वाय फाय ची सुविधा असणे आवश्यक आहे.


1) प्रथम आपल्या स्मार्टफोन मधील प्ले स्टोर वर जा व Mouse and Keyboard Remote हे app डाउनलोड करून घ्या.


2) हेच app आपल्याला आपल्या ज्या कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप वर वापरायचे आहे त्यावर सुद्धा इंस्टॉल करावे लागेल.


3) यासाठी आपल्याला android-remote.com या साईट वर जावून याचा सर्वर डाउनलोड करावा लागेल. यासाठी आपल्या ब्राउज़र मधे खालील अड्रेस टाइप करा. -

remote-control

collection.com/download/server/windows/


4) येथून आपला Remote control server डाउनलोड करा व इंस्टॉल करा.


5) आता आपल्या फोनमधील Mouse & Keyboard Remote App आणि कंप्‍यूटर मधील Remote Control Server ला रन करा. आता Mouse & Keyboard Remote App च्या मेनुमधे जा आणि Add a new Devices वर क्लीक करा. आणि आपल्या कंप्‍यूटर च्या  वायफाय ने कनेक्ट करा.


6) कनेक्‍ट झाल्यावर  रिमोट्स वर जा आणि माउस, की-बोर्ड या अायकॉन वर  क्लिक करा व वायरलेस की-बोर्ड आणि माउस चा वापर सुरु करा.


7) एकदा कनेक्ट झाल्यावर आपण इंटरनेट बंद करु शकता .हे app आपल्या कॉम्प्यूटर व फोन यामधील वायफाय कनेक्शन ने काम करते त्यामुळे यासाठी इंटरनेट आवश्यक नाही.


संकलित


No comments:

Post a Comment