K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 OTG केबल चे उपयोग :-

Key Board

     OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर.याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.


माऊस

     OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.


USB FAN

     OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.


कार्ड रीडर

     OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.


Game कंट्रोलर

     आपले आवडते game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.


 USB Light

     Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.


Lan Cable

     ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.


हार्ड डिस्क

     Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.


DSLR

     Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल.


ऑडिओ साऊंड कार्ड्स

     ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.


OTG  ने मोबाईल चार्जिंग

     तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते.


No comments:

Post a Comment