K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 22 January 2021

 छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) होण्याची कारणे, लक्षणे उपाय :-

                छातीत जळजळ होणे याला ॲसिडिटी किंवा मराठीत आपण त्याला आम्लपित्त असे म्हणतो. ह्याचा त्रास प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा होतोच!

              ॲसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. हे आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लॅन्डसमधून स्रवले जाते ह्यामुळे अन्नाचे पचन होते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे जास्त प्रमाणात स्रवले गेले तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

 

ॲसिडिटी होण्याची कारणे :-

☘️ अपुरी झोप, जेवणाच्या वेळेत अनियमितता, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, अति तेलकट, मसालेदार अन्न खाणे, विरुद्ध आहार घेणे, धुम्रपान करणे, मद्यपान करणे, सततची काळजी ताणतणाव या अशा कारणांनी छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) व्हायला लागते.

      तसेच जर काही वेदनाशामक किंवा प्रतिजैविके घेतली किंवा ऍस्पिरिन सांधेदुखीची औषधे सुरू असली तरीही ऍसिडिटी वाढू शकते.

 

ॲसिडिटीची लक्षणे :-

छातीत किंवा घशात जळजळणे, पोटात आग पडणे, वारंवार कडू-आंबट पाणी घशाशी येणे, अस्वस्थ वाटणे, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, करपट ढेकर येणे, अंगावर लाल रंगाच्या रॅशेस येणे, अंगाला खाज सुटणे, चक्कर येणे, आंबट उलटी झाल्यानंतर बरे वाटणे ही ॲसिडिटी वाढण्याची प्रमुख लक्षणे आहेत.


ॲसिडिटी साठी कोणते उपाय करावेत?

. आहारात बदल

ॲसिडिटी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात अति तेलकट, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा, असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ होणार नाही.


. जेवण सावकाश करा 

जेवण करताना घाई करू नका. जेवण आरामात करा जेणेकरून प्रत्येक घास व्यवस्थित चावला जाईल. प्रत्येक घासासोबत पाचक रस व्यवस्थित मिसळला जाईल आणि अन्नाचे पाचन व्यवस्थित होईल. छातीत जळजळ होणार नाही.


. गूळ

गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्याची शक्ती वाढते. त्यामुळे दररोज जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा घ्या अन तो चावून खाता तोंडात ठेवून चघळा. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.


. बडीशेप

जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे ही चांगली सवय आहे.  चिमुटभर भाजकी बडीशेप खाल्याने पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अपचन आणि छातीत जळजळ यावर बडीशेप हा सोपा प्रभावी उपाय आहे.


. आवळा

जेवण झाल्यानंतर आवळा सुपारी, किंवा एक चमचा आवळ्याचा मोरावळा खा. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.


. शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील पीएच ॲसिडिक लेव्हल कमी होऊन अल्कलाईन होते. ह्याने पोटात आवश्यक असलेले म्युकस सुद्धा तयार होते. ह्या म्युकसमुळे अतिरिक्त प्रमाणात ॲसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते. शहाळ्याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते ॲसिडिटी वाढणे कमी होते.


. तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा - पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.


. दालचिनी

 दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट जागेवर येते. अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.

 

. ताक

 ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो. मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ॲसिडिटी न्यूट्रलाइज करते.

 

. आलं

 आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून चोखल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो. मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक तर ट्राईड अँड टेस्टेड औषध आहे.

 

१०. लवंग

 आयुर्वेद औषधांमध्ये लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. लवंगीत कार्मीनेटीव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.


 ११. केळी

 केळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड्स असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर केळी खाणे अतिशय चांगले आहे. केळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो.

 

१२. फळे

 ॲसिडिटी वाढली असताना कलिंगड, सफरचंद व डाळिंब खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतोॲसिडिटी कमी होते तसेच ॲसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होतो.


----------------------------------

ॲसिडिटी म्हणजे नेमके काय?

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.


अ‍ॅसिडिटी का होते?

पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry.


*Hurry* – भराभरा जेवल्याने हवा गिळली जाते. म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते.


*Worry* – अनावश्यक अतिकाळजी करत राहणे.


*Curry* – मसालेदार पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट.


आपलं आयुष्य हल्ली सुपरफास्ट झालंय. लोकांना सकाळी ब्रेकफास्ट घ्यायला पण वेळ नसतो. नुसताच चहा, कॉफी इ. पेय घेतली जातात; ज्यामुळे पोटातील अ‍ॅसिड किंवा आम्लपित्त वाढते व अ‍ॅसिडिटी जाणवू लागते.


धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विविध टेन्शनखाली जगत असतो. ८.३० ची लोकल गाठायची, ऑफिसातल्या बॉसचं व कामाचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचे, करिअरचे टेन्शन, बायकांना ऑफिस, मुलं, घरकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टींत ताळमेळ साधायचे टेन्शन, डोक्यावर कर्ज असेल तर त्याचे अजून टेन्शन, या विविध ताणांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो व त्यामुळे जठर-रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते व अ‍ॅसिडिटीची सुरुवात होते. पोटात जळजळ होणाऱ्या बऱ्याच रुग्णांना मानसिक तणावांनी ग्रासलेले असते.

            फास्ट फूडच्या जमान्यात भूक लागली की रस्त्यात उभे राहून कुठेही वडापाव, पावभाजी, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, दाबेली इ. सटरफटर खाल्ल जातं. त्यामुळे अमिबीयासिस किंवा जियारडिआसिस यासारखे इन्फेक्शन होते व त्यामुळे अ‍ॅसिडिटी (gastritis) चा त्रास होतो.

          अयमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार निर्माण होतात.   ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर फक्त एका महिन्याच्या शास्त्रशुद्ध हर्बल ट्रीटमेंट ने  तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून कायमचा आराम मिळेल व दिनचर्येतील योग्य त्या बदलाने ही समस्या परत उद्भवणारही नाही.


गॅसची समस्या निर्माण होण्याचे खास लक्षणं -


1. मळमळ

2. उलटी

3. वारंवार उचकी

4. पोटदुःखी आणि सूज

 

पाणी प्यावे -

पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे या आजाराचे मोठे कारण आहे.


रात्री भरपेट जेवून तत्काळ झोपणे, रात्री खूप उशिरा झोपणे, कॉल सेंटर किंवा शिफ्टबदलीच्या नोकऱ्या. यामुळे रात्री जागरण व दिवसा अपुरी झोप यामुळे अ‍ॅसिडिटी बळावते.


मद्यपान करणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा कुठल्याही दुखण्यासाठी ब्रुफेन किंवा त्यासारखे वेदनाशामक औषध घेत राहणे, आहारात जास्त तेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही अ‍ॅसिडिटी वाढते. अन्नातील तिखटपणा हिरवी मिरची, लाल मिरची, आले-लसूण पेस्ट, मिरपूड इ. या पदार्थानी येतो. असे पदार्थ सर्वाना सोसतीलच असे नाही. ज्या लोकांना असे पदार्थ सोसत नाहीत, त्यांना पोटात किंवा छातीत जळजळ/ विस्तव पेटविल्यासारखे वाटते.


अतिकडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिडिटी होते. शिळे अन्न खाल्लय़ाने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.


भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा मूल्यवान मुद्दा आपण विसरतो व अनेकदा दोन घास जास्तीचे खातो. त्यामुळेदेखील आम्लपित्त वाढते व आंबट ढेकर येऊ लागतात.


संकलित

No comments:

Post a Comment