ब्लॉग कसा तयार कराल? :-
1) ब्लॉग तयार करण्यासाठी स्वताचा Gmail id व Password
असणे आवश्यक आहे.
2) सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाइटवर जा. तेथे Username व Password टाकून Sign in करा.
3) यानंतर New Blog ला क्लिक करा. ब्लॉगचे Title (शिर्षक) व तुम्हाला ठेवायचा Blog Address टाका.
उदाहरणार्थ:- www.kpborase.blogspot.com
4) त्याखालील हवे ते Template निवडा व Create Blog ला क्लिक करा. निवडलेल्या टेम्पलेटवर ब्लॉगची रचना अवलंबून असते.
5) आता New Post ला क्लिक करा. तेथे MS-Word पेज ओपन होईल. याठिकाणी आपली पोस्ट तयार करा व Publish करा, व View Blog करा.
6) New Page ला क्लिक करा, त्याचे Title टाका व Save करा. यानंतर हवे तेवढे Pages हे Title टाकून तयार करा.
(माहिती तयार असल्यास पेजेसवर माहिती भरा, फोटो टाका. )
7) नंतर Layout वर जा. तेथे Header मध्ये ब्लॉगचे मुखपृष्ठ करता ईमेज Add करा. त्याखाली Add Gazzet वर क्लिक करून Pages हे Gazzet Add करा.त्यात अगोदर तयार केलेली Pages सिलेक्ट करून सेव्ह करा, हे Pages तुम्हाला ब्लॉग च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
8) खाली Add Gazzet वर क्लिक करून हवी ती Gazzet अॅड शकता.
9) आता Layout पेजच्या डाव्या कोपर्यात Template Designer वर क्लिक करा. (येथे ब्लॉगची Design करता येते. )
तेथे Layout वर साईडबार कसे हवे ते सिलेक्ट करा व Apply to Blog करा.
10) शेवटी सर्वात महत्वाच्या Advanced या मेनुवर जा. तेथे ब्लाॅगची सर्व रंगसंगती व रचना करता येते. तेथे आपल्या आवडीने रंगसंगती ठरवा. खाली तुम्हाला Live Blog दिसेल. सर्व रचना झाल्यावर Apply to Blog करायला विसरू नका.
11) आपण Google Drive, Dropbox यावर आपल्या फाईल सेव्ह करून त्याची लिंक तेथून काॅपी करून ब्लॉग वर हवी तेथे पेस्ट करू शकतो. इतर वेबसाईटच्या लिंक या प्रकारे देता येतात.
संकलित
No comments:
Post a Comment