सावधान!‘या’ चुकांमुळे होतो बद्धकोष्ठतेचा गंभीर त्रास, करा हे सोपे घरगुती उपाय :-
पौष्टिक आहाराचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी झाल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात. यामुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो.
निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल होणं देखील गरजेचं आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनांचा सराव नियमित करणंही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल न झाल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ आहारामध्ये हिरव्या भाज्या, दलिया, पोहे, ओट्स, टरबूज, कलिंगड, केळे आणि डाळींचा समावेश करावे. सोबत दिवसभरात किमान एक तासासाठी व्यायाम देखील करावा.
फायबरमुळे पोट स्वच्छ होते :-
- बद्धकोष्ठतेचा त्रास लहानांपासून ते वयोवृद्धांमध्येही आढळतो. हा त्रास कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.
- फायबरयुक्त पदार्थांमुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. फायबरच्या सेवनामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे पचन प्रक्रियेवर कोणताही ताण येत नाही. अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते.
- फायबरचे पचन जलद गतीनं होत नाही. यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जास्त काळ टिकून राहते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.
- फायबरमुळे शरीरामध्ये मल जमा होऊन राहत नाही. शौचास त्रास देखील होत नाही.
जास्त प्रमाणात पाणी प्या :-
- उन्हाळ्यामध्ये शरीर डिहायड्रेट होऊ नये, यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखणं गरजेचं आहे.
- घरामध्ये असताना आपलं पाणी पिण्याचे प्रमाण अतिशय कमी असते. पण ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही.
- दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
- घरात असतानाही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
- पाण्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवी आणि मलाद्वारे बाहेर फेकले जातात.
बद्धकोष्ठतेची कारणे :-
- आतड्यांची हालचाल कमी होणे
- जठराग्नी चांगले नसणे
- पौष्टिक आहाराचा अभाव
- वजन कमी किंवा जास्त असणे
- मानसिक विकारांमुळे हा त्रास होऊ शकतो
- कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन
- पोटाचे सर्वच विकार
- शरीरात पाण्याची कमतरता असणे
- दुधाच्या सेवनाचा अभाव
- अंमली पदार्थांचे व्यसन
- अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे
- बदलती जीवनशैली, बैठ्या स्वरुपातील कामे
- उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनवर सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो
बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी करा योग :-
अश्विनी मुद्रा :-
योग क्रियेमध्ये अश्विनी मुद्रा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. अश्विनी मुद्रेमुळे हर्निया, गुदद्वारसंबंधीचे आजार, बद्धकोष्ठता इत्यादींचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
- अश्विनी मुद्रेमध्ये गुदद्वार आकुंजन करणे आणि त्यानंतर सैल सोडण्याची क्रिया केली जाते. तुम्हाला जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून ही क्रिया करणे शक्य आहे, त्या पद्धतीनं या योगाभ्यासाचा सराव करावा. पण दोन्ही हात कायम ज्ञान मुद्रेमध्ये असावेत.
- पण प्रशिक्षकांसमोरच योगासनांचा सराव करावा. अन्यथा शारीरिक दुखापती होण्याची शक्यता असते.
अळशीच्या बिया :-
- अळशीच्या बिया मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करून घ्या.
- अळशीच्या बियांची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवा. तीन ते चार तासांना हे पाणी गाळून घ्या आणि प्या. डॉक्टरांकडून अळशीच्या पावडरचे सेवन करण्याचे प्रमाण विचारून घ्या.
- अळशीच्या बियांमध्ये सॉल्युबल फायबर चे घटक आहेत. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर अळशीच्या बिया रामबाण उपाय आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट चे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. अळशीमध्ये कित्येक अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स देखील संतुलित राहण्यास मदत होते.
मध :-
-एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबूचा रस मिक्स करून प्या.
- मध शरीरासाठी पोषक आहे. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर मध हा प्रभावी घरगुती उपाय आहे. आयुर्वेदामध्ये मधास अतिशय महत्त्व आहे. कित्येक औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो.
- आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देखील देण्यात आला आला आहे. मधामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी - मायक्रोबिअल आणि अँटी - इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
Very informative information
ReplyDeleteThanks a lot.
Delete