स्मार्टफोनच्या अती वापरामुळे उद्भवणारे धोके :-
स्मार्टफोनपासून उद्भवत असलेले काही धोके पुढीलप्रमाणे...
सांभाळा डोळ्यांना! :-
मानवी डोळा ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे.
पण स्मार्टफोनमुळे त्यावर आघात होतोय.
वारंवार मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला काही इंचांवर लक्ष केंद्रित करायची सवय लागत असल्यामुळे आपण लांब अंतरावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हरवून बसतोय.
हमे निंद ना आये :-
चॅटिंग करत किंवा मोबाइल हाताळत झोपण्याची अनेकांना सवय असल्यामुळे अनेक जणांना झोपताना आपल्या उशाशी आपला स्मार्टफोन ठेवण्याची वाईट सवय असते.
पण एलसीडी स्क्रीन डोळ्यासमोर धरल्यामुळे आपल्या झोपेचं चक्र बिघडतं,
असं अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे.
त्यामुळे तुम्हाला
'मला झोपच येत नाही'
ही समस्या भेडसावत असेल तर त्यामागे स्मार्टफोनचा अतिवापर हे कारण नक्कीच असू शकतं.
जंतूंचं घर :-
दिवसभर आपण अनेक वस्तू हाताळत असल्यामुळे आपला दररोज जंतूंशी लढा सुरुच असतो,
पण स्मार्टफोनचा नेहमीच कान आणि आपल्या तोंडाशी/
चेहऱ्याशी संबंध येत असल्याने स्मार्टफोन्समुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.
'मान'
सांभाळा :-
आपल्या डोक्याचं वजन पेलण्याचं काम आपल्या पाठीचा कणा करत असतो.
मोबाइलमध्ये डोकावण्यासाठी-पाहाण्यासाठी ज्यावेळी आपण आपलं डोकं पुढे करतो किंवा झुकवतो,
त्यावेळी आपल्या पाठीच्या कण्यावर ताण येतो.
ज्यामुळे मानेच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला वेदना होतात.
वैद्यकीय भाषेत याला
'टेकस्ट नेक'
असंदेखील म्हणतात.
जरा जपूनच! :-
वाहन चालवताना कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होणं धोकादायकच असतं,
पण स्मार्टफोनमुळे लक्ष विचलित होण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं.
व्हर्जिनिया टेक ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूटनं
(Virginia Tech Transportation Institute) केलेल्या अभ्यासानुसार, गाडी चालवताना चालक फोन वापरत असल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
स्मार्टफोन्समुळे रस्त्यावरून चालताना देखील तुमचं लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका असतो.
अतिवापर वाढवतो ताण :-
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे ताणतणावांच्या प्रमाणात वाढ होतं.
स्वीडनमधील गोथेनबर्ग
(Gothenburg) विद्यापीठाने स्मार्टफोन वापरणाऱ्या विशीत असलेल्या तरुणांचा वर्षभर अभ्यास केल्यावर त्यातून पुढे आलेले निष्कर्ष खूपच धक्कादायक होते.
या निष्कर्षांनुसार जास्त प्रमाणात मोबाइलचा वापर करणाऱ्यांमध्ये नैराशाचं प्रमाण जास्त दिसलं.
हे प्रमाण पुरुष आणि महिला दोघांमध्ये आढळलं.
इतर धोके कोणते? :-
स्मार्टफोनच्या अतिवापराचा परिणाम तुमच्या घनिष्ठ मैत्रीवरही होऊ शकतो,
असं एका सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.
एसएक्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मोबाइलचा जास्त वापर केल्यामुळे लोकांमध्ये आपल्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते.
स्मार्टफोनच्या अती वापराने होतात 'हे' आजार :-
आजच्या युगात स्मार्टफोन म्हणजे जीव की प्राण;
पण त्याचा अतिरेकी वापर जीवावरही बेतू शकतो.
स्मार्टफोनच्या अति वापरामुळे वेगवेगळे आजार होत असल्याचे दिसून आले आहे.
त्या आजारांसंबंधीची ही माहिती...
नोमोफोबिया
फोन आपल्याजवळ नाही हे कळाल्यावर येणारी अस्वस्थता,
फोन वाजल्याचा भास होणे,
फोन न दिसल्यास भीती वाटणे यापैकी काहीही होत असेल तर ती नोमोफोबियाची लक्षणे आहेत असे समजावे.
लक्षणे :
घाबरणे, मोबाइल वाजल्याचा भास होणे,
मोबाइल व्हायब्रेट झाल्यासारखे वाटणे,
मोबाइल नजरेआड गेल्यास अस्वस्थता येणे.
काय काळजी घ्याल
: मोबाइलपासून ठराविक काळानंतर ब्रेक घेत जा,
मोबाइलचे व्यसन लावून घेऊ नका.
टेक्स्ट नेक :-
सतत मोबाइलमध्ये डोके घालून बसल्याने मान,
तसेच मणक्याला कायमची इजा होऊ शकते.
लक्षणे :
मान दुखणे,
पाठीला त्रास होणे.
काय काळजी घ्याल :
कान आणि खांद्याच्या मध्ये फोन पकडून बोलणे टाळा.
आडवे पडून मेसेज करणे टाळा,
चालताना चॅटिंग करू नका.
या आजारांशिवाय एकसारखे फोनच्या स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांमधील ओलावा कमी होणे,
सतत गाणी ऐकल्याने कानांवर परिणाम होणे,
डोके दुखणे यांसारखे आजारही फोनच्या अतिवापरामुळेच होतात.
याशिवाय फोनशी संबंधित मानसिक आजारही काळजीचाच विषय आहे.
त्यामुळे स्मार्टफोन,
सोशल मीडिया यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर अतिरेकी प्रमाणात करू नका,
एवढाच तज्ज्ञांचा सल्ला.
टेक्स क्लॉ :-
फोनच्या वजनामुळे किंवा फोन सतत तळहातावर ठेवल्याने मनगट,
तसेच तळहात दुखावला जातो.
वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार तळहाताला कायमचा निकामी बनवू शकतो.
लक्षणे :
मनगट जड वाटणे,
बोटांना अचानक मुंग्या येणे,
तळहात जड वाटणे,
तसेच तळहात हलवतानात्रास होणे.
काय काळजी घ्याल :
फोनचा सतत वापर करू नका.
फोनचा वापर एकाच हाताने नको,
दोन्ही हातांनी करा.
.
स्मार्टफोन थम्ब :-
फेसबुक लाइक,
मेसेज टाइप करणे,
गेम्स खेळणे,
फोटो पाहणे यांसारख्या सर्वच गोष्टींसाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर होतो.
त्यामुळे दिवसभर सरसर फिरणाऱ्या अंगठ्याच्या हाडाला कायमची इजा होऊ शकते.
अंगठ्याच्या टोकावरील संवेदना नष्ट होण्यासारखे आजार मोबाइलच्या अतिवापरामुळे होतात.
लक्षणे :
अंगठ्याला कसलीही जाणीव न होणे.
अंगठ्याचे हाड दुखणे.
अंगठा वाकवताना त्रास होणे,
अंगठ्याची पेरे दुखणे.
काय काळजी घ्याल :
कमीत कमी चॅटिंग करा.
जास्त बोलायचे असल्यास थेट फोन करा.
सतत एकाच हाताने टायपिंग करणे टाळा.
स्मार्टफोन थम्ब :-
फेसबुक लाइक,
मेसेज टाइप करणे,
गेम्स खेळणे,
फोटो पाहणे यांसारख्या सर्वच गोष्टींसाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर होतो.
त्यामुळे दिवसभर सरसर फिरणाऱ्या अंगठ्याच्या हाडाला कायमची इजा होऊ शकते.
अंगठ्याच्या टोकावरील संवेदना नष्ट होण्यासारखे आजार मोबाइलच्या अतिवापरामुळे होतात.
लक्षणे :
अंगठ्याला कसलीही जाणीव न होणे.
अंगठ्याचे हाड दुखणे.
अंगठा वाकवताना त्रास होणे,
अंगठ्याची पेरे दुखणे.
काय काळजी घ्याल :
कमीत कमी चॅटिंग करा.
जास्त बोलायचे असल्यास थेट फोन करा.
सतत एकाच हाताने टायपिंग करणे टाळा.
No comments:
Post a Comment